अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघानं विशाखापट्टणमच्या मैदानातील लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात केली. अक्षर पटेल याने टॉस जिंकून रिषभ पंतच्या लखनौ संघाला पहिल्यांदा फलंदाजीला निमंत्रित केले. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सलोकेश राहुलशिवाय मैदानात उतरला आहे. गत हंगामात लखनौ संघ मालक आणि केएल राहुल यांच्यातील मैदानातील वाद चांगलाच गाजला होता. त्यानंतर यंदाच्या हंगामापासून लोकेश राहुल दिल्ली कॅपिटल्सकडून आपली नवी इनिंग सुरु करतोय. पण पहिल्याच सामन्यात जुन्या फ्रँचायझी संघाविरुद्धच्या सामन्यात तो मैदानात उतरला नाही. जाणून घेऊयात त्यामागचं कारण
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या खास कारणामुळे पहिल्या सामन्याला मुकला
गत हंगामात लखनौ संघाचे नेतृत्व करताना दिसलेला लोकेश राहुल या संघाविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरण्यामागचं कारण गत हंगामात त्याचा संघ मालकांसोबत गाजलेला वाद किंवा त्याची दुखाप आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडू शकतो. पण हे त्यामागचं कारण नाही. लोकेश राहुलची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीकडे असणारी गूडन्यूजमुळे लोकेश राहुल हा सामना खेळत नसल्याचे समजते. तो लवकर बाबा होणार असून या काळात त्याने मॅचसाठी मैदानात उतरण्याऐवजी आपली पत्नी अथियासोबत थांबण्याला पसंती दिलीये.
IPL 2025 DC vs LSG : 'बापू' म्हणजे जबाबदारी निभावण्याची 'गॅरेंटी'च; नेतृत्वात तोच पॅटर्न दिसणार?
संघाच्या ताफ्यातून बाहेर पडत घरी परतला लोकेश राहुल, हे आहे त्यामागचं कारण
क्रिकबझच्या वृत्तानुसार, रविवारी रात्रीच लोकेश राहुल हा मुंबईला परतला आहे. अथिया शेट्टी पहिल्या अपत्याला जन्म देणार असल्यामुळे तो संघाच्या ताफ्यातून बाहेर पडत घरी पोहचलाय. घरी परतलेल्या लोकेश राहुलनं सोमवारी पत्नी आथियासह इंस्टाग्रामवर एक संयुक्त पोस्टही शेअर केली आहे. स्वीट कपलनं दोन हंसांचे एक फोटो शेअर करत घरी नन्ही परी आल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. पहिल्या सामन्याला मुकल्यानंतर तो दुसऱ्या सामन्यासाठी पुन्हा संघाच्या ताफ्यात जॉईन होईल, अशी अपेक्षा आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ दुसरा सामना ३० मार्चला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विशाखापट्टणमच्या मैदानातच खेळणार आहे.
६ कोटीचा घाटा करून दिल्लीच्या ताफ्यात सामील झालाय KL राहुल
आयपीएल मेगा लिलावाआधी १८ कोटींची ऑफर नाकारत लोकेश राहुलनं लखनौच्या संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. १२ कोटीसह दिल्ली कॅपिटल्स संघानं त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. ६ कोटीचा घाटा झाला पण या संघात एन्ट्री मारल्यावर त्याला कॅप्टन्सीची ऑफरही होती. पण त्याने फक्त खेळाडूच्या रुपात खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे अक्षर पटेलकडे दिल्ली संघानं आपले नेतृत्व सोपवले आहे.