Join us

IPL 2025: यंदाच्या हंगामात KKR च्या 'बेस्ट फिनिशर'चा तोराच नाही दिसला!

इथं एक नजर टाकुयात बेस्ट फिनिशरच्या रुपात ओळखल्या जाणाऱ्या रिंकू सिंहच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:20 IST

Open in App

IPL 2025 DC vs KKR 48th Match Player to Watch Rinku Singh Kolkata Knight Riders : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला आपला रुबाब दाखवता आलेला नाही. एका बाजूला सलामीला बेधडक फलंदाजी करण्यात सुनील नेरनला छाप सोडता आली नाही. दुसरीकडे बेस्ट फिनिशर रिंकू सिंह आपली जबाबदारी पार करण्यात कमी पडल्याचे पाहायला मिळाले. परिणामी संघ मागे पडल्याचे दिसते. उर्वरित सामन्यात या दोन्ही उणीवा भरून निघल्या नाहीत तर KKR च्या संघाला स्पर्धेत टिकून राहणे कठीण होऊन बसेल. इथं एक नजर टाकुयात बेस्ट फिनिशरच्या रुपात ओळखल्या जाणाऱ्या रिंकू सिंहच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीवर...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दोन सामने सोडले तर रिंकूचा रुबाबच नाही दिसला

रिंकू सिंह याला बेस्ट मॅच फिनिशरच्या रुपात ओळखले जाते. कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्याकडून त्याने सातत्याने काही अविस्मरणीय खेळी करून अशक्यप्राय वाटणारा सामना संघाला जिंकून दिल्याचे पाहायला मिळाले आहे. पण गत हंगामासह यंदाच्या हंगामात त्याच्या फलंदाजीत तो तोरा दिसत नाही. यंदाच्या हंगामात ८ सामन्यात ७ वेळा तो बॅटिंगसाठी मैदानात उतरला. सनरायढझर्स हैदराबाद विरुद्ध १७ चेंडूत केलेल्या ३२ धावा आणि लखनौ विरुद्ध १५ चेंडूत केलेल्या ३८ धावांची खेळी सोडली तर त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल

७ डावात फक्त ६ षटकार

रिंकू सिंह म्हटलं की, आठवते ती  २०२३ च्या हंगामातील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गजुरात टायटन्स यांच्यातील मॅच. एका षटकात २९ धावांची गरज असताना रिंकूनं यश दयालच्या षटकात सलग ५ षटकार मारत KKR ला सामना जिंकून दिला होता. त्यानंतरही त्याने आपल्या भात्यातील फकेबाजीच्या जोरावर सामने फिरवल्याचे पाहायला मिळाले. पण यंदाच्या हंगामात तो संघासाठी अजून तरी उपुक्त ठरल्याचे दिसत नाही. ७ डावात त्याच्या खात्यात फक्त ६ षटकारांची नोंद आहे. 

KKR संघासाठी तो तारणहार ठरणार का?

 गत चॅम्पियन कोलकाता संघाने पहिल्या ९ सामन्यात फक्त ३ सामने जिंकले आहेत. एका अनिर्णित सामन्यासह त्यांच्या खात्यात ७ गुण जमा आहेत. आता स्पर्धेत टिकण्यासाठी KKR साठी प्रत्येक सामना महत्त्वाचा झालाय. या परिस्थितीत रिंकू सिंह याच्याकडून संघाला मोठी आशा असेल. तो  उर्वरित सामन्यात जबाबदारी खांद्यावर घेऊन आपल्यातील धमक दाखवणा का? ते पाहण्याजोगे असेल.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५इंडियन प्रीमिअर लीगरिंकू सिंगकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली कॅपिटल्स