Join us

CSK चा पराभव अभिनेत्रीच्या जिव्हारी लागला! श्रुती हासनचा स्टँडमधील व्हिडिओ होतोय व्हायरल

CSK च्या पराभवानंतर अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 01:45 IST

Open in App

IPL 2025 Shruti Haasan Breaks Down After CSK Loss : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर खेळवण्यात आला. सनरायझर्सचा सामना असला की, काव्या मारन चर्चेत असतेच. SRH संघ मालकीणीने चेन्नईच्या मैदानातही मैफिल लुटल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय चेन्नई सुपर किंग्जला चीअर करण्यासाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांनीही हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत थाला नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता अजितकुमार  हा पत्नी आणि मुलासह चेन्नई सुपर किंग्ज आणि  सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना पाहण्यासाठी स्टँडमध्ये उपस्थितीत असल्याचे स्पॉट झाले. याशिवाय कमल हासन यांची कन्या आणि लोकप्रिय अभिनेत्री श्रुती हासन ही देखील स्टँडमध्ये स्पॉट झाली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अजितकुमारचा कडक लूक

CSK ला चीअर करण्यासाठी आलेल्या स्टार कलाकारांचे स्टँडमधील फोटो सोशल मीडियावरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या एक्स अकाउंटवर व्हायरल होताना दिसत आहेत. अजितकुमार याने काळ्या रंगातील सूटमध्ये कडक लूकसह लक्षवेधून घेतले. तो पत्नी पत्नी शालिनीसह मुलगा अद्वैकसोबत सामन्याचा आनंद घेताना दिसला. एमएस धोनीची बॅटिंग बघताना त्याने आपल्या मुलाला मांडीवर घेतल्याचेही पाहायला मिळाले.

श्रुती हासनची झलक दिसली 

 अभिनेत्री श्रुती हासन ही देखील क्रिकेटसह धोनीची मोठी चाहती आहे. चेन्नईत रंगलेल्या सामन्यात पुन्हा एकदा तिची दिवानगी पाहायला मिळाली. धोनी बॅटिंगला आल्यावर ती आपल्या मोबाईलमध्ये धोनीचा फोटो कॅप्टर करतानाही दिसून आले. चेन्नईचा संघ जिंकेल, या आशेनं ती संघाला चीअर करताना दिसली.

IPL 2025 : रिक्स नको रे बाबा! जड्डू फसल्यावर MS धोनीनं काढला 'हातोडा' (VIDEO)

CSK नं मॅच गमावल्यावर अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ व्हायरल

पण शेवटी CSK च्या अन्य चाहत्यांप्रमाणे तिच्या पदरीही निराशा आली. CSK च्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई सुपर किंग्जच्या घरच्या मैदानातील पराभवानंतर अभिनेत्रीचा चेहरा पडल्याचे पाहायला मिळाले. एक्स अकाउंटवर स्टँडमधील तिचा अवघ्या काही सेकंदाचा एक व्हिडिओही व्हायरल होताय. ज्यात तिचे डोळे पाणावल्याचे दिसून येते. CSK चा पराभव जिव्हारी लागल्यावर ती रडल्याची गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५