IPL 2025 CSK vs SRH : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघानेही चेन्नई सुपर किंग्जच्या बालेकिल्ल्यात विजयी पताका फडकावलीये. आयपीएलच्या पहिल्यांदाच त्यांनी चेपॉकच्या मैदानात चेन्नईला पराभूत केले आहे. १७ वर्षांनी चेपॉकच्या मैदानात पाहायला मिळालेला 'सूर्योदय' प्लेऑफ्सच्या दृष्टीने SRH संघासाठी आशेचा 'किरण'च आहे. उर्वरित पाच सामने जिंकून ते अजूनही आघाडीच्या चारमध्ये पोहचू शकतात. दुसरीकडे या पराभवासह चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास आणखी खडतर झालाय. ते फक्त जर तरच्या समीकरणावर स्पर्धेत टिकून आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चेन्नई सुपर किंग्जचा बॅटिंगमध्ये पुन्हा फ्लॉप शो; बऱ्याच वर्षांनी ओढावली ऑल आउटची नामुष्की
आयुष म्हात्रे ३० (१९), रवींद्र जडेजा २१ (१७), डेवॉन ब्रेविस ४२ (२५), शिवम दुबे १२ (९) आणि दीपक हुड्डा २२ (२१) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण एकालाही चांगल्या खेळीचे रुपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. परिणामी चेन्नईचा संघ निर्धारित २० षटकेही खेळू शकला नाही. २०१९ च्या हंगामानंतर पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जवर घरच्या मैदानात ऑल आउट होण्याची नामुष्की ओढावली. चेन्नईचा संघ १९.५ षटकात १५४ धावांवर आटोपला होता.