IPL 2025 : ऑरेंज आर्मीचा 'मोहरा' झाला अन् 'हर पल पर्पल' तोऱ्यात मिरवणारा मागे पडला

जाणून घेऊयात त्याचा आयपीएलमधील खास विक्रम अन् यंदाच्या हंगामातील कामगिरीबद्दल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:25 IST2025-04-25T15:23:49+5:302025-04-25T15:25:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 CSK vs SRH 43rd Match Lokmat Player To Watch Harshal Patel Sunrisers Hyderabad | IPL 2025 : ऑरेंज आर्मीचा 'मोहरा' झाला अन् 'हर पल पर्पल' तोऱ्यात मिरवणारा मागे पडला

IPL 2025 : ऑरेंज आर्मीचा 'मोहरा' झाला अन् 'हर पल पर्पल' तोऱ्यात मिरवणारा मागे पडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 CSK vs SRH 43rd Match Player To Watch Harshal Patel Sunrisers Hyderabad : सनरायझर्स हैदराबादचा संघ म्हटलं की, चर्चा रंगते ती त्यांच्या स्फोटक अन् तगड्या बॅटरची. पहिल्या सामन्यात तोऱ्यात बॅटिंगसह या संघाने ३०० पारची स्वप्नही दाखवली. पण हा नाद संघाच्या अंगलट आला. पहिल्या ८ सामन्यात फक्त २ विजय अन् ६ पराभवामुळे हैदराबादच्या स्फोटक बॅटिंगचा फुगा फुटल्याचे पाहायला मिळाले. हा संघ कधीकाळी आपल्या गोलंदाजीमुळेही चर्चेत राहिला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

'हर पल पर्पल' तोऱ्यात मिरणारा गोलंदाज पडला मागे

यंदाच्या हंगामातही कर्णधार पॅट कमिन्स याच्यासह आयपीएलच्या इतिहासात दोन वेळा पर्पल कॅप जिंकणाऱ्या हर्षल पटेलच्या रुपात भेदक मारा करणारे गोलंदाज या संघात आहेत. या दोन स्टार गोलंदाजांपैकी एकही गोलंदाज सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आघाडीच्या २० मध्येही दिसत नाही. ऑरेंज आर्मीत सामील झाल्यावर 'हर पल पर्पल' तोऱ्यात मिरणारा हर्षल पटेलही मागे पडल्याचे दिसते. जाणून घेऊयात त्याचा आयपीएलमधील खास विक्रम अन् यंदाच्या हंगामातील कामगिरीबद्दल 

IPL 2025 : मोठ्या अपेक्षेसह CSK नं त्याचा पगार तिप्पट केला; पण...

सर्वाधिक दोन वेळा पर्पल कॅप जिंकणाण्याचा रेकॉर्ड

आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. ऑरेंज आर्मीच्या ताफ्यातून खेळणाऱ्या हर्षल पटेल याने आतापर्यंत दोन वेळा पर्पल कॅप जिंकली आहे. २०२१ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून खेळताना ३२ विकेट्स मिळवत त्याने पहिल्यांदा पर्पल कॅप पटकावली होती. गत हंगामात पंजाब संघाकडून खेळताना त्याने २४ विकेट्स घेत दुसऱ्यांदा पर्पल कॅपवर कब्जा केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याच्याशिवाय भुवनेश्वर कुमार (२०१६ आणि २०१७) आणि ड्वेन ब्रावो (२०१३ आणि २०१५) यांनी दोन हंगाम गाजवले आहेत. पण यंदाच्या हंगामात हर्षल पटेल खूपच मागे पडल्याचे दिसते.

हर्षल पटेलची यंदाच्या हंगामातील कामगिरी

हर्षल पटेलनं यंदाच्या हंगामातील ७ सामन्यात २३ षटके गोलंदाजी करताना ९ विकेट्स घेतल्या आहेत. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात ४२ धावा खर्च करत ४ विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात तो आपला ४ षटकांचा कोटाही पूर्ण करू शकला नव्हता. परिणामी या दोन सामन्यात तो विकेट लेस राहिला. 

Web Title: IPL 2025 CSK vs SRH 43rd Match Lokmat Player To Watch Harshal Patel Sunrisers Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.