Join us

नेट बॉलर ते हुकमी एक्का! CSK च्या संघानं नूर अहमदवर का लावलाय मोठा डाव?

हा युवा फिरकीपटू मोक्याच्या क्षणी संघाला विकेट मिळवून देण्यात माहिर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:57 IST

Open in App

IPL 2025 CSK vs RCB 8th Player to Watch Noor Ahmad :  चेन्नई सुपर किंग्जच्या संघानं यंदाच्या आयपीएल हंगामासाठी मजबूत संघ बांधणी करताना अफगाणिस्तानच्या छोट्याशा गावातून आलेल्या २० वर्षीय युवा पोरावर मोठा डाव खेळला. आयपीएल मेगा लिलावात नूर अहमदला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चेन्नईच्या संघानं १० कोटी खर्च केले. या युवा क्रिकेटरनंही चेन्नई सुपर किंग्जकडून अगदी धमाक्यात पदार्पण केल्याचंही पाहायला मिळालं. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात  सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेत या पठ्ठ्यानं आपल्यावर खेळलेला डाव एकदम परफेक्ट असल्याची झलक दाखवून दिलीये. आता आगामी सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. आरसीबीच्या ताफ्यातील किंग कोहलीसमोरही  तो मोठं चॅलेंज ठरू शकतो.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!३० लाखांच्या गड्याला CSK नं कोट्यवधी देत केलं मोठं

आता आयपीएलमध्ये तो काही पहिल्यांदा खेळत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर अल्पावधितच छाप सोडणाऱ्या हा युवा फिरकीपटूने २०२२ च्या हंगामातच गुजरात टाययटन्स संघाच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. पहिल्या दोन हंगामात ३० लाख एवढ्या मूळ किंमतीसह खेळणाऱ्या या भिडूवर चेन्नई सुपर किंग्जच्या संघानं कोट्यवधीचा डाव खेळला. मेगा लिलावात या फिरकीपटूला घेण्यासाठी मुंबई इंडियन्स- गुजरात टायटन्स यांच्यात कडवी टक्कर झाली. चेन्नई सुपर किंग्जनं ५ कोटीचा डाव लावल्यावर गुजरातने आरटीएम कार्ड काढल्यावर CSK च्या संघानं त्याच्यावर १० कोटी लावत फायनल बाजी मारली होती.

IPL 2025: MS धोनीच्या CSK विरूद्ध '१३ हजारी' बनण्याची विराट कोहलीला मोठी संधी!

 युवा फिरकीपटूवर CSK नं का खेळला एवढा मोठा डाव?

नूर अहमद हा आपल्या जादुई फिरकीसह भल्या भल्या फलंदाजांची गिरकी घेण्याची क्षमता असणारा लेफ्ट आर्म स्पिनर आहे. टर्निंग ट्रॅकवर खेळताना मधल्या षटकात तो सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.  याच उद्देशााने चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने त्याच्यावर मोठा डाव खेळला आहे. आयपीएलमध्ये चेन्नईचा संघ बहुतांश सामने घरच्या मैदानावर खेळताना दिसेल. इथं नूर अहमद प्रतिस्पर्धी संघासाठी अधिक धोकादायक ठरू शकतो.  

नूर अहमदचा आयपीएलमधील रेकॉर्ड 

नूर अहमद याने गुजरात टायटन्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. पण त्याआधी तो  CSK च्या ताफ्याचा भाग होता.  २०२१ च्या हंगामात नेट बॉलरच्या रुपात तो चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत होता. इथं घडल्यावरच  २०२२ मध्ये गुजरात टायटन्सच्या संघात त्याची एन्ट्री झाली होती. २०२३ मध्ये आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामात  १३ सामन्यात १६ विकेट्स घेत त्याने लक्षवेधून घेतले. गत हंगामात १० सामन्यात त्याने ८ बळी टिपले होते. आता चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना त्याचा आलेख आणखी उंचावेल, अशी अपेक्षा आहे. 

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमहेंद्रसिंग धोनीइंडियन प्रीमिअर लीग