चेन्नई येथील चेपॉकच्या मैदानात इग्लंडचा ऑलराउंडर सॅम कुरेन याने बढती मिळाल्यावर आपल्या बॅटिंगमधील धमाका दाखवून दिला. ज्या पंबाब किंग्ज संघाचे नेतृत्व केले त्या संघाविरुद्ध त्याने चेन्नईकडून खेळताना आयपीएल कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले. अर्धशतकी खेळीनंतर त्याचा तोरा बघण्याजोगा होता. कॉलिंग सेलिब्रेशनसह त्याने लक्षवेधून घेतले. Ex टीमविरुद्धच्या दमदार खेळीनंतर त्याने दिलेला मिस कॉल नेमका कुणासाठी होता? हा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
५ वर्षांनी IPL मध्ये पुन्हा CSK कडून झळकावली फिफ्टी
पंजाब किंग्जशिवाय सॅम कुरेन याआधीही चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना पाहायला मिळाले आहे. २०२० च्या हंगामात तो चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. या हंगामात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना चेन्नई सुपर किंग्जकडून अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर आता पाच वर्षांनी त्याने CSK कडून खेळतना फिफ्टी झळकावली. यंदाच्या हंगामातील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले.
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरल्यावर मारली कडक फिफ्टी
पंजाबने भाव न दिल्यामुळे यंदाच्या हंगामात तो CSK च्या ताफ्यात पुन्हा आला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला संधीही मिळाली. पण या सामन्यात त्याला छाप सोडता आली नव्हती. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ९ चेंडूत फक्त ४ धावा केल्या. बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळीही तो अपयशी ठरला. १३ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या मागच्या सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. या सामन्यात १० चेंडूत ९ धावांवर तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. या तिन्ही सामन्यात गोलंदाजीत त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण पुन्हा धोनीनं त्याच्यावर विश्वास दाखवला अन् अखेर त्याने हा विश्वास सार्थ ठरवला. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने ४७ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ८८ धावांची दमदार खेळी केली. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च कामगिरी आहे.
मिस कॉल कुणाला?
सॅम कुरेन याच्या सेलिब्रेशनचा नेमका अर्थ लावणे कठीण आहे. कारण त्यामागे अनेक गोष्टींची मालिकाच आहे. कॉलिंग सेलिब्रेशनमध्ये त्याने प्रीती झिंटाच्या सह मालकीच्या पंजाब किंग्जला मिस कॉल दिला का? असा प्रश्नही निर्माण होतो. कारण गत हंगामात संघाचे नेतृत्व करूनही पंजाबच्या संघाने मेगा लिलावात त्याला भाव दिला नव्हता. याशिवाय त्याच्या सेलिब्रेशनमागे इंग्लंड क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांवरील रागही असू शकतो. कारण त्याला इंग्लंडच्या राष्ट्रीय संघातून व्हाइट बॉल क्रिकेटमधून डावलण्यात आले आहे.