Join us

IPL 2025 :चेन्नईवाल्यांना १८० प्लसचं कोडं पुन्हा नाही सुटलं; दिल्लीकर विजयाच्या हॅटट्रिकसह टॉपला

धोनी शेवटपर्यंत थांबला, पण चेन्नई धावांचा पाठलाग करताना पुन्हा अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 19:36 IST

Open in App

IPL 2025 Chennai Super Kings vs Delhi Capitals, 17th Match : चेपॉकच्या घरच्या मैदानावरही चेन्नई सुपर किंग्ज संघाला १८० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना अपयश आले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना केएल राहुलच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर  निर्धारित २० षटकात ६ बाद १८३ धावा करत चेन्नईसमोर १८४ धावांचे सेट केले होते.  या धावांचा पाठलाग करताना विजय शंकरच्या भात्यातून अर्धशतक आले. त्याच्यापोपाठ धोनीनं संघाकडून दुसऱ्या क्रमांकाची मोठी धावसंख्या केली. पण चेन्नईला काही यशस्वी पाठलाग करणं जमलं नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

CSK वर दहाव्यांदा ओढावली ही नामुष्की, दिल्ली कॅपिटल्सची विजयाची हॅटट्रिक

दिल्लीच्या संघाने चेन्नईच्या बालेकिल्ल्यात दमदार विजय मिळवत आपल्या खात्यात आणखी २ गुणांची भर घातली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाला १८० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग दहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. १८० प्लस धावा करा अन् चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करा हा एक फॉर्म्युलाच सेट झाल्याचे दिसते. तोच फॉर्म्युला वापरत दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं दिमाखदार विजयास यंदाच्या हंगामात विजयाच्या हॅटट्रिकचा डाव साधला. सलग तिसऱ्या विजयासह दिल्ली कॅपिटल्सचा संघाने गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे.

 IPL 2025 : पियानोवादक ते यॉर्कर किंग! पोराला घडवणाऱ्या MS धोनीला क्रिकेटरची फॅमिली मानते देव

KL राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर DC नं सेट केलं होते १६४ धावांचे टार्गेट

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार अक्षर पटेल याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला.  जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या साथीनं लोकेश राहुनं दिल्ली कॅपिटल्स संघाच्या डावाची सुरुवात केली. पण जेक फ्रेझर-मॅकगर्क खातेही न उघडता तंबूत परतला.  पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावर लोकेश राहुल आणि अभिषेक पोरेल या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचत डाव सावरला. २० चेंडूत ३३ धावा करत अभिषेक पोरेलनं आपली विकेट गमावली. त्याची जागा घेण्यासाठी आलेला अक्षर पटेल १४ चेंडूत २१ धावांची भर घालून चालता झाला. समीर रिझवीनं १५ चेंडूत २० धावांचे योगदान दिले. एका बाजूला विकेट पडत असताना केएल राहुल मात्र दिमाखात खेळला. त्याने ५१ चेंडूत क ६ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने केलेल्या ७७ धावांच्या खेळीसह स्टब्सनं १२ चेंडूत केलेल्या २४ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर दिल्लीच्या संघानं निर्धारित २० षटकात धावफलकावर ६ बाद १८३ धावा लावल्या होत्या.

विजय शंकरसह धोनी शेवटपर्यंत खेळला, पण चेन्नईचा संघानं सामना गमावलाया धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. रचिन रविंद्र ३(६), डेवॉन कॉन्वे १३(१४) आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड ५ (४) स्वस्तात  माघारी फिरले. चेन्नईकडून विजय शंकननं ५४ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला धोनी २६ चेंडूत ३० धावा करून नाबाद राहिला, पण चेन्नईला टार्गेट काही गाठता आले नाही. निर्धारित २० षटकात चेन्नईच्या संघानं ५ विकेट्स गमावत १५८ धावंपर्यंत मजल मारली.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्सदिल्ली कॅपिटल्सलोकेश राहुलमहेंद्रसिंग धोनी