IPL 2025 CSK vs DC 17th Match Player to Watch Matheesha Pathirana Chennai Super Kings : आयपीएलमध्ये धमक दाखवून अनेक क्रिकेटर्सचे करिअर शिखरावर पोहचल्याचे पाहायला मिळाले आहे. यात फक्त भारतीय चेहऱ्यांचा समावेश नाही. इथं परदेशातील हिऱ्याची पारखही झालीये. CSK च्या ताफ्यातील मलिंगा अर्थात मथीशा पाथिराना त्यापैकीच एक. २२ वर्षीय जलदगती गोलंदाजाने क्रिकेटच्या मैदानात आपली विशेष छाप सोडलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धोनीनं त्याला हेरलं अन् पियानोवादक जलदगती गोलंदाजच्या रुपात घडला
पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आपल्या यॉर्कर लेंथ चेंडूवर भल्या भल्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावणाऱ्या मथीशा पाथिराना याचे क्रिकेट हे कधीच पहिले प्रेम नव्हते. संगीत अन् पियानोची धून हेच त्याचे विश्व होते. कुटुंबियांकडून त्याला संगीताचा वारसा लाभल्यामुळे हा छंद त्याला जडला होता. या गड्यानं पियानो वादनाचे व्यावसायिक शिक्षणही घेतले आहे. तो एक उत्तम पियानोवादक आहे. पण धोनीनं त्याला हेरलं अन् पियानोवादक एक जलदगती गोलंदाज झाला. इथं जाणून घेऊयात तो कसा घडला? महेंद्रसिंह धोनी त्याच्यासाठी भाग्यविधाता कसा ठरला? यासंदर्भातील अनटोल्ट स्टोरी
नेट बॉलर ते हुकमी एक्का! CSK च्या संघानं नूर अहमदवर का लावलाय मोठा डाव?
पायलट होण्याच स्वप्न हवेत विरलं अन् क्रिकेट मैदानात हीच त्याच्यासाठी 'धावपट्टी' झाली
मथीशा पाथिराना याचा जन्म श्रीलंकेतील कँडी येथील संगीतकार घराण्यात झाला. वडील अनुरा प्रशिक्षित गायक तर आई शालिका या गायिका. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याचा कलही वाद्य अन् संगीत याकडेच झुकला. मग मध्येच त्यानं पायलटचंही स्वप्न पाहिले. पण शेवटी क्रिकेट मैदानात हीच त्याच्यासाठी धावपट्टी झाली अन् तो गतीसह योग्य चेंडू अचू टप्प्यावर लँड करणारा यॉर्कर स्पेशलिस्ट झाला. शालेय स्तरावरील अंडर १५ आणि अंडर १७ क्रिकेटमधून त्याच्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात झाली. श्रीलंकन माजी गोलंदाज लसिथ मलिंगासारखी गोलंदाजी करण्याच्या शैलीमुळे तो प्रकाशझोतात आला. मग चमिंड वास याने त्याला श्रीलंकेतील दिग्गज क्रिकेटर घडले त्या महागड्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. क्रिकेटरच्या फॅमिलीसाठी धोनी झाला देव, मथीशा पाथिरानाच्या मनातही धोनीसाठी खास स्थान
CSK च्या व्हिडिओ अॅनालिस्टनं सर्वात आधी मथीशा पाथिराना हेरले. या खेळाडूला चेन्नईच्या ताफ्यात सामील करून घेतले पाहिजे ही चर्चा सुरु झाली. २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ इंज्युरी रिप्लेसमेंटच्या शोधात असताना मथीशा पाथिराना CSK फ्रँयायझी संघाने संधी दिली. नेटमध्ये धोनीनं त्याला पाहिले अन् बघता क्षणी कॅप्टन कूलनं मथीशा पाथिरानावर प्रतिभावंत खेळाडू असल्याचा शिक्का मारला. CSK चं नेतृत्व करत असताना धोनीनं त्याचा योग्य वापर केलाच. पण त्याला क्रिकेट जगतातील सर्वात खतरनाक गोलंदाजाच्या रुपात घडवलं. CSK कडून सर्वोत्तम कामगिरी केल्यावर मथीशा पाथिरानासाठी श्रीलंकन राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडले होते. आपल्याला घडवणाऱ्या धोनीला तो वडिलांसमान मानतो. एवढेच नाही तर श्रीलंकन क्रिकेटरची फॅमिली धोनीला देव माणूस मानते.