भारत-पाक यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतील धर्मशाला मैदानात रंगलेला सामना थांबण्यात आला आहे. या सामन्यानंतर आयपीएल स्पर्धा स्थिगित केली जाऊ शकते. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) बैठक सुरु असल्याचे समजते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना सुरक्षित घरी पाठवणे ही देखील बीसीसीआयची पहिली प्राथमिकता असेल. यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच त्या संदर्भात निर्णय होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.
IPL मधील पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना सामना रद्द,
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ८ मे रोजी पंजाब किंग्ज (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामन्यानंतर हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला स्टेडियम खाली करण्यात आले. बीसीसीआयने खेळाडूंना दिल्लीत आणण्यासाठी खास ट्रेनची व्यवस्था केली आहे.
काय म्हणाले BCCI सचिव?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सध्याची परिस्थिती पाहात आम्ही सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. खेळाडू आणि प्रेक्षकांची सुरक्षा हीच प्राथमिकता आहे. परिस्थितीनुसार स्पर्धेसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले आहेत.