Setback to Gujarat Titans IPL 2025: यंदाच्या हंगामात आतापर्यंत २५ सामने खेळले गेले आहेत. सर्वच संघांनी कमीतकमी ४ सामने खेळले असून, आपल्या संघाची बलस्थाने व कमकुवत बाजू सर्वांनाच कळली आहेत. त्यामुळे आता संघाची बांधणी कशी असावी यावर सर्व संघ प्रकर्षाने लक्ष देत आहेत. अशातच एका IPL संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातील एक स्टार खेळाडू अचानक घरी परतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत थक्क करणारे झेल घेणारा न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips Ruled Out) स्पर्धेतून माघार घेतली आहे. अचानकच त्याने हा निर्णय घेतला असून, तो गुजरात टायटन्स संघ सोडून मायदेशी परतला आहे.
ग्लेन फिलिप्सची माघार का?
न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने गुजरात टायटन्स संघ सोडला आहे. तो त्याच्या देशात परतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करू शकते. मेगा लिलावात गुजरात टायटन्सने ग्लेन फिलिप्सला १ कोटी ५० लाखांना खरेदी केले होते. पण त्याला कोणत्याही सामन्यात संघाच्या प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली नाही. मात्र ६ एप्रिलच्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याला फिल्डिंगसाठी बदली खेळाडू म्हणून बोलवण्यात आले. त्याच वेळी ग्लेन फिलिप्सला दुखापत झाली. चेंडू थ्रो करण्याचा प्रयत्न करताना त्याला स्नायूंमध्ये ताण आला. यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर तो संघाच्या सरावातही दिसला नाही. आता त्याने स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगितले जात आहे.
गुजरातकडे उरले केवळ मोजकेच परदेशी खेळाडू
ग्लेन फिलिप्सच्या जाण्यामुळे गुजरातवरील दडपण आणखी वाढले आहे. त्याआधी कागिसो रबाडादेखील दक्षिण आफ्रिकेत परतला होता. तो संघात कधी सामील होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. अशा परिस्थितीत गुजरात संघात सध्या फक्त मोजकेच परदेशी खेळाडू आहेत. ज्यामध्ये जोस बटलर, शेरफेन रदरफोर्ड, रशीद खान, गेराल्ड कोएत्झी, राशिद खान आणि करीम जनत यांची नावे आहेत. सध्या संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ५ सामन्यांत ४ विजयांसह संघ अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही. मात्र आणखी एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास संघबांधणीला अडचण येऊ शकेल.
Web Title: IPL 2025 Big blow to Gujarat Titans Champions Trophy star Glenn Phillips ruled out returns back to home groin injury
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.