Join us

बंगळुरू संघ आयपीएल चॅम्पियन बनेल, माजी अष्टपैलू क्रिकेटरची भविष्यवाणी

आयपीएल'मधील २०२५ च्या सर्व संघांमध्ये बंगळुरू सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या संघांपैकी एक आहे. या संघाने गेल्या काही वर्षांत अनेक सर्वोत्तम खेळाडू निर्माण केले; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 08:58 IST

Open in App

नवी दिल्ली: आयपीएल'मधील २०२५ च्या सर्व संघांमध्ये बंगळुरू सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या संघांपैकी एक आहे. या संघाने गेल्या काही वर्षांत अनेक सर्वोत्तम खेळाडू निर्माण केले; परंतु दुर्दैवाने, आतापर्यंत त्यांना जेतेपदापर्यंत झेप घेता आलेली नाही, यंदा हा संघ आयपीएल चॅम्पियन बनेल, असे धाडसी वक्तव्य माजी अष्टपैलू रोहन गावसकर याने केले. 

क्रिकबझशी बोलताना रोहन म्हणाला की, बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद हे चार संघ पहिल्या चार स्थानांवर राहतील. यापैकी बंगळुरू आणि दिल्ली संघाने आतापर्यंत जेतेपदाचा स्वाद चाखलेला नाही. बंगळुरूकडून गेल्या काही वर्षांत बिस गेल, एबी डिव्हिलियर्स, मिशेल स्टार्क आणि केविन पीटरसनसारखे खेळाडू खेळले. तरीही सांघिक खेळ करण्यात अपयशी ठरल्याने बंगळूरू विजेता ठरू शकला नाही. विराट कोहली या संघातून सतत खेळत आहे. तो संघाला जेतेपदाची भेट देऊ शकेल. 

यंदा सर्वाधिक धावा काढणारे आणि सर्वधिक बळी घेणारे खेळाडू कोण ठरतील, असे विचारले असता रोहन पुढे म्हणाला, 'युवा अभिषेक शर्माला मी अव्वल स्थान देईल. बळी घेणाऱ्यांच्या यादीत अनुभवी जसप्रीत बुमराहला अव्वल स्थानावर ठेवू इच्छितो, अभिषेक हा धडाकेबाज सलामीवीर असून गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. गेल्यावर्षी त्याने यशस्वी फलंदाजी करीत हैदराबादला फायनलमध्ये पोहोचविले होते. दुसरीकडे अनुभवी बुमराह 'पर्पल कॅप'चा दावेदार मानला जातो. त्यासाठी तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. मुंबई संघ सुरुवातीच्या सामन्यांत त्याच्या सेवेला मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही, हेन्रिच क्लासेन आणि ट्रॅव्हिस हेड यापैकी एक खेळाडू यंदाच्या लीगमधील सर्वांत मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार जिंकेल, असे भाकीतही रोहनने केले. 

आयपीएलमधील रनमशीन्स खेळाडू             धावा         सामने विराट कोहली         ८००४         २५२ शिखर धवन         ६७६९         २२२ रोहित शर्मा         ६६२८         १८४ डेव्हिड वॉर्नर         ६५६५         १८४ सुरेश रैना             ५५२८         २०५ महेंद्रसिंग धोनी         ५२४३         २६४ ए. बी. डिव्हिलियर्स     ५१६२         १८४ ख्रिस गेल             ४९६५         १४२ 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रोहन गावसकरविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर