इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. या हंगामात रिषभ पंत लखनौ सुपर जाएंट्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. लखनौच्या संघानं पंतला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत आपल्या ताफ्यात घेतले होते. त्याच्याशिवाय या आणखी काही स्टार खेळाडू आहेत ज्यांच्यावर संघाला जेतेपद मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असेल. त्यातीलच एक नाव म्हणजे ऑस्ट्रेलियाचा धाकड अष्टपैलू मिचेल मार्श. फलंदाजी आणि गोलंदाजीत सामन्याला कलाटणी देणाऱ्या खेळाडूसाठी LSG संघानं कोट्यवधी रुपये मोजले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवेळी दुखापतीमुळे त्याने माघार घेतली अन् ऑस्ट्रेलियन संघासोबत लखनौच्या ताफ्यालाही धक्का बसला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतच्या LSG संघाला दिलासा मिळाला, पण अर्धाच, कारण...
मिचेल मार्श नॅशनल ड्युटी करायला उपलब्ध झाला नव्हता. पण तो आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशाची परतफेड करायला तयार आहे. याचा अर्थ तो दुखापतीतून सावरून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा लखनौसाठी मोठा दिलासा असला तरी यातही थोडं ट्विस्ट आहे. कारण ज्या गड्यावर संघानं फलंदाजी आणि गोलंदाजी करेल, यासाठी ३ कोटी ३० लाख रुपये मोजले तो फक्त या हंगामात फलंदाजीच करू शकतो, अशी माहिती समोर येतीये. त्यामुळे फुल सॅलरीत तो हाफ ड्युटी करणार असाच काहीसा प्रकार त्याच्याबाबतीत पाहायला मिळणार असल्याचे दिसते.
बिग बॅश लीगमध्ये खेळलायच अखेरचा सामना
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल मार्श हा पुढच्या आठवड्यात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यात सामील होईल, अशी अपेक्षा आहे. पाठीच्या दुखापतीतून सावरून तो कमबॅक करत असल्यामुळे यंदाच्या हंगामात तो फलंदाजाच्या रुपातच खेळणार आहे. मार्शनं आपला अखेरचा सामना हा ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये जानेवारीमध्ये खेळला होता. बॅटरच्या रुपात त्याला LSG किती सामन्यात खेळवणार ते पाहण्याजोगे असेल.
IPL मध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसलाय हा ऑस्ट्रेलियन खेळाडू
मिचेल मार्श हा आयपीएलच्या गत हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसले होते. यादरम्यानही तो सातत्याने दुखापतीचा सामना करताना दिसले. फक्त चार सामने खेळल्यावर स्नायू दुखापतीच्या समस्येनं झाला अन् त्याने घरचा रस्ता धरला. यावेळी तो दुखापतीतून सावरून फक्त बॅटिंगच्या जारावर तरी संपूर्ण हंगाम खेळणार का? हा एक मोठा प्रश्नच आहे. आयपीएलमध्ये मार्श सनरायझर्स हैदराबाद, रायझिंग पुणे सुपर जाएंट्स, पुणे वॉरियर्स आणि डेक्कन चार्जस या संघाकडून खेळला आहे.