Join us

KL राहुलची क्लास फिफ्टी! 'घरवाली' अथियानं शेअर केली 'लव्ह वाली' स्टोरी

नवरोबाची फिफ्टी अन् बायको अथियाचं खास अंदाजात सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:38 IST

Open in App

Athiya Shetty Shares Insta Story For Husband KL Rahul Hit Half Century: चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलनं दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमध्ये लोकेश राहुलनं डावाची सुरुवात करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. पण नव्या फ्रँचायझीकडून तो पहिल्यांदाच ही भूमिका बजावताना दिसला. एवढेच नाही तर त्याने दमदार खेळीसह अर्धशतकही झळकावले.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दिल्लीकडून पहिले अन् आयपीएलमधील ३८ वे अर्धशतक

चेन्नई विरुद्धच्या अर्धशतकी खेळीसह त्याने आयपीएलमध्ये ३८ व्या अर्धशतकाला गवसणी घातली. त्याने ३३ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने  हे अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने ५१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने १५०.९८ च्या स्ट्राइक रेटनं आपल्या बॅटिंगमधील क्लास दाखवला. त्याच्या या दमदार अर्धशतकामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात६ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारली.

 

IPL 2025 : पियानोवादक ते यॉर्कर किंग! पोराला घडवणाऱ्या MS धोनीला क्रिकेटरची फॅमिली मानते देव

ओपनिंगच्या जागेवर टाकला रुमाल

केएल राहुल नुकताच एका मुलीचा बाबा झाला आहे. बाबा होणार असल्यामुळे तो यंदाच्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या सामन्यालाही मुकला होता. पण आता संघाला जॉईन झाल्यावर मिळेल ती जबाबदारी एकदम परफेक्ट निभावण्यासाठी तयार असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. या आधीच्या सामन्यात तो मध्यफळीत खेळताना दिसला होता. पण आता या दमदार खेळीमुळे पुढेही तो याच क्रमांकावर खेळताना दिसला तर नवल वाटणार नाही.

KL राहुलच्या लव्हली खेळीनंतर अथियाची प्यार वाली स्टोरी चर्चेत

आयपीएलच्या मॅचेस अनेकदा केएल राहुलला चीअर करण्यासाठी त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री स्टेडियमवर दिसली आहे. पण नुकतीच आई झाल्यामुळे ती  मॅच वेळी स्टेडियमवर येऊ शकत नाही. पण लोकेश राहुलच्या खेळीचा घरबसल्या आनंद घेतला अन् नवरोबाच्या फिफ्टीचं खास अंदाजात सेलिब्रेशनही केले. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर अथियानं लोकेश राहुलचा सेलिब्रेशन करतानाच्या फोटोसह लव्ह इमोजीसह खास फोटो शेअर केला आहे. तिची ही इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतीये.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५लोकेश राहुलअथिया शेट्टी दिल्ली कॅपिटल्सचेन्नई सुपर किंग्सऑफ द फिल्ड