लखनौच्या एकाना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला आणि निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावून बंगळुरूसमोर २३२ धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, हैदराबादचा सलामीवर अभिषेक शर्माच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्मा ओपनिंग करण्यासाठी मैदानात उतरला. त्याने डावाच्या सुरुवातीपासूनच स्फोटक फलंदाजी केली. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने दुसरा षटक टाकला. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अभिषेकने उत्तुंग षटकार मारला. मात्र, हा स्टेडियममध्ये उभ्या असलेल्या टाटा कर्व्ह कारच्या काचेवर आदळला. दरम्यान, आयपीएल सुरू होण्याआधी टाटा मोटर्सने घोषणा केली होती की, एखाद्या फलंदाजाने चेंडू थेट गाडीवर मारला तर, अंडर प्रिविलेज्ड मुलांना ५ लाख रुपयांचे क्रिकेट किट वाटतील.
अभिषेकच्या ४०० हून अधिक धावासनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नसला तरी, अभिषेक शर्माने संघासाठी चांगली कामगिरी केली. त्याने संघासाठी १३ सामन्यांमध्ये एकूण ४४५ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
हैदराबादचे बंगळुरूसमोर २३२ धावांचे लक्ष्यया सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या हैदराबादच्या संघाने बंगळुरूसमोर २३२ धावा केल्या. हैदराबादकडून इशान किशनने सर्वाधिक ९४ धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त अभिषेकने ३४ धावांचे योगदान दिले. अनिकेत वर्माने २६ धावा केल्या. आरसीबीकडून रोमारियो शेफर्डने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.