Join us

BCCI ची नोकरी गमावलेल्या अभिषेक नायरसाठी KKR नं उघडले दरवाजे? वरुण चक्रवर्तीनं दिली हिंट

अभिषेक नायर पुन्हा एकदा कोलकाता संघात सामील होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 22:19 IST

Open in App

Abhishek Nayar KKR Comeback : भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक पदावरुन उचलबांगडी झाल्यावर अभिषेक नायर पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात सामील होण्याची चर्चा रंगू लागली आहे.  केकेआरच्या संघातील मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने इन्स्टाग्रामवर अकाउंटवरुन एक इन्स्टा खास स्टोरी शेअर केलीये. ज्यात त्याने अभिषेक नायरसोबतचा फोटो शेअर केल्याचे दिसते.  क्रिकेटरनं शेअर केलेली स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत असून अभिषेक नायर पुन्हा एकदा कोलकाता संघात सामील होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोलकाता नाईट रायडर्स किंवा अभिषेक नायर यांनी अधिकृतरित्या यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

BCCI च्या नोकरीतून मुक्त झाल्यावर तो पुन्हा KKR च्या संघासोबत दिसणार?

अभिषेक नायर याला अवघ्या ८ महिन्यांच्या कार्यकाळानंतर बीसीसीआयच्या सहाय्यक प्रशिक्षक पदावरून हटवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टीम इंडियाच्या पराभवासह ड्रेसिंग रुममधील बातम्या लीक प्रकरणाशीही या कारवाईचा संबंध जोडला जात आहे. बीसीसीआयच्या ड्युटीतून मुक्त झाल्यावर नायर पुन्हा एकदा आपल्या जुन्या आयपीएल फ्रँचायझीसोबत दिसणार असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसते. 

KKR

आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!

कोलकाता फ्रँचायझीसाठी मोलाचे योगदान

अभिषेक नायर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एक खास बॉन्डिंग आहे. या फ्रँचायझी संघाच्या अकदामीच्या नेतृत्वाशिवाय त्याने या संघातील युवा खेळाडूंना विकसित करण्यासाठी व्यक्तिगतरित्या काम केले आहे. कोलकाता फ्रँचायझी संघ त्याच्या योगदानामुळे प्रभावित आहे. त्यामुळे तो पुन्हा या संघात दिसला तर नवल वाटण्याोगे नाही.

अभिषेक नायरची क्रिकेट कारकिर्द

अभिषेक नायर (Abhishek Nayar) एक माजी अष्टपैलू क्रिकेटर आहे. टीम इंडियाकडून त्याने फक्त ३ वनडे सामने खेळले असले तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने खास छाप सोडलीये. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०३ सामन्यात त्याच्या खात्यात ५७४९ धावांसह १७३ विकेट्सची नोंद आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये २१४५ धावांसह त्याने ७९ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. टी २० क्रिकेटमध्ये १२९१ धावांसह त्याच्या खात्यात २७ विकेट्सची नोंद आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सवरूण चक्रवर्तीव्हायरल फोटोज्