Join us  

IPL 2024: "प्लीज इम्पॅक्ट प्लेअरचा नियम बदला कारण...", RCB च्या प्रमुख खेळाडूची खदखद

आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ संघर्ष करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 3:14 PM

Open in App

आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ संघर्ष करत आहे. फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीला केवळ एक सामना जिंकता आला आहे. आयपीएलमध्ये नव्याने लागू झालेला इम्पॅक्ट प्लेअरचा नियम खूप प्रभावी ठरत आहे. यामुळे अष्टपैलू खेळाडूंना कमी लेखले जात असल्याची खंत भारतीय कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली. अशातच आता आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने हा नियम बदलण्याची मागणी केली. सिराजने मिश्किलपणे सांगितले की, कृपया इम्पॅक्ट प्लेअर हा नियम काढून टाका... अगोदरच विकेट फ्लॅट आहे ज्यामुळे गोलंदाजांची डोकेदुखी वाढते. सिराजने हे विधान केकेआरविरूद्धच्या सामन्यापूर्वी केले. केकेआरने आरसीबीला नमवून बंगळुरूच्या जखमेवर मीठ चोळले. आयपीएलचा यंदाचा हंगाम विविध कारणांनी ऐतिहासिक आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम वारंवार मोडत आहे. त्यांनी आरसीबीविरूद्ध २८७, मुंबईविरूद्ध २७७ आणि दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध २६६ धावा कुटल्या. 

सिराजने व्यक्त केली खदखद 'स्पोर्ट्स स्टार'ने दिलेल्या वृत्तानुसार सिराज म्हणतो की, आयपीएलमध्ये खूप पूर्वी २५० हून अधिक धावा व्हायच्या... पण आताच्या घडीला हे सामान्य झाले आहे. तसेच मी इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात आहे, मी या नियमाचा चाहता नाही. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडू मागे जात आहेत. क्रिकेट हे फक्त ११ खेळाडूंसह खेळले जाते १२ नाही. लोकांच्या मनोरंजनासाठी हे सर्वकाही केले जात आहे, असे काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. 

रोहित म्हणाला की, इम्पॅक्ट प्लेअरकडे बारकाईने पाहिले तर यामुळे अष्टपैलू खेळाडूंचे नुकसान होत आहे. मी शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या भावना समजू शकतो. त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळत नाही. ही आपल्यासाठी चांगली बाब नाही. 

टॅग्स :आयपीएल २०२४मोहम्मद सिराजरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरटी-20 क्रिकेट