IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आजच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. सनरायझर्स हैदराबाद, जो संघ विक्रमांमागून विक्रम रचतोय, त्यांच्यासमोर अडखळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे. घरच्या मैदानावर SRH आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम पुन्हा एकदा मोडतील, असा दावा केला जात होता. RCB च्या गोलंदाजीची हालत पाहता अब की बार ३०० पार... हे नारे SRH साठी दिले गेले, परंतु RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
SRH ७ सामन्यांत ५ विजय मिळवून १० गुणांसह सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तेच RCB ला ८ पैकी एकच सामना जिंकता आला आहे आणि आज हरल्यास त्यांचे आव्हान संपल्यात जमा होणारे आहे. पॅट कमिन्सचा हा पन्नासावा आयपीएल सामना आहे, तर RCB चा हा २५० वा आयपीएल सामना आहे. मुंबई इंडियन्सनंतर असा पराक्रम करणारा तो दुसरा संघ ठरला आहे. SRH-RCB आतापर्यंत २३ वेळा समोरासमोर आले आणि त्यात हैदराबादने सर्वाधिक १३ विजय मिळवले, तर १० सामने गमावले.