Join us

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफसाठीच्या उर्वरित दोन जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 19:52 IST

Open in App

IPL 2024, SRH vs GT Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफसाठीच्या उर्वरित दोन जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतेय. कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांनी प्ले ऑफमधील आपली जागा पक्की केली आहे, तर KKR ने १९ गुणांसह क्वालिफायर १ मधील स्थानही निश्चित केलं आहे. SRH आज घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सचा सामना करणार आहेत. GT चे स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा आहे. हैदराबाद १२ सामन्यांत ७ विजय मिळवून १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांना उर्वरित दोन सामने जिंकून १८ गुणांसह क्वालिफायर १ साठी दावा सांगण्याची संधी आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आहे. 

हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?

आकडेवारीराजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक ६१ षटकार लागले आहेत आणि ही एखाद्या स्टेडियमवरील संयुक्त अव्वल कामगिरी आहेवृद्धीमान सहा आणि डेव्हिड मिलर या दोघांना आयपीएलमध्ये ३००० धावा पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे ६७ व ७६ धावा हव्या आहेत. भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेताच तो ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण करणारा भारताचा पहिला जलदगती गोलंदाज ठरेल. युझवेंद्र चहल, पियूष चावला आणि आर अश्विन या फिरकीपटूंनी हा पराक्रम केला आहे.   आता हाती आलेल्या वृत्तानुसार ८ वाजता टॉस होईल आणि ८.१५ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादगुजरात टायटन्स