Join us

IPL 2024 SRH vs CSK: ६,६,६,६,४,४,४ छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेकच्या खेळीने CSK ला फुटला घाम

IPL 2024 Live Score Update SRH vs CSK: हैदराबादच्या अभिषेक शर्माने त्याच्या छोट्या खेळीत षटकारांचा पाऊस पाडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 21:50 IST

Open in App

IPL 2024 SRH vs CSK Match Live Updates । हैदराबाद: चेन्नईने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्माने स्फोटक खेळी केली. त्याने पहिल्या षटकापासून रूद्रावतार दाखवत पाहुण्या चेन्नईची डोकेदुखी वाढवली. अभिषेकने ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने १२ चेंडूत ३७ धावा कुटल्या. चेन्नईचा इम्पॅक्ट प्लेअर मुकेश चौधरीच्या एकाच षटकात त्याने २७ धावा खेचल्या. (IPL 2024 News) 

घातक वाटणाऱ्या अभिषेकला बाद करण्यात दीपक चाहरला यश आले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभिषेकचा झेल रवींद्र जडेजाने टिपला. हैदराबादला डावाच्या ४६ धावांवर पहिला झटका बसला. 

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६५ धावा केल्या. यजमान हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, पॅट कमिन्स, शाहबाज अहमद, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. गोलंदाजांनी केलेल्या सांघिक खेळीच्या जोरावर यजमानांनी सामन्यात पुनरागमन केले. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत ४५ धावा कुटल्या, तर रचिन रवींद्र (१२), ऋतुराज गायकवाड (२६), अजिंक्य रहाणे (३५) आणि डेरिल मिचेल (१३) धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा (३१) आणि महेंद्रसिंग धोनी (१) धावा करून नाबाद परतला. 

SRH चा संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, टी नटराजन. 

CSK चा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डेरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा. 

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबाद