Join us  

मानलं संजू! RR च्या कॅप्टनने पराभवाचं खापर ना गोलंदाजांवर फोडले, ना फलंदाजांवर; म्हणाला... 

तुम्ही सामना कुठे हरलात? सामन्यानंतर पराभूत संघाच्या कर्णधाराला विचारला जाणारा पहिला प्रश्न हाच असतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 3:57 PM

Open in App

IPL 2024 RR vs GT : तुम्ही सामना कुठे हरलात? सामन्यानंतर पराभूत संघाच्या कर्णधाराला विचारला जाणारा पहिला प्रश्न हाच असतो... यावर अनेक कर्णधार गोलंदाज, फलंदाज व क्षेत्ररक्षण यांच्यातल्या चुका सांगताना दिसले आहेत, परंतु राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) याने दिलेलं उत्तर ऐकून समालोचक अवाक् झाला. गुजरात टायटन्सने बुधवारी राजस्थान रॉयल्सची आयपीएल २०२४ मधील विजयी मालिका खंडित केली. RR ने सलग चार सामने जिंकले होते, परंतु कालच्या सामन्यात राशिद खानने शेवटच्या चेंडूवर चौकार खेचून GT ला रोमहर्षक विजय मिळवून दिला. GT ने १९७ धावांचे लक्ष्य ३ विकेट्स राखून पार केले. 

MI vs RCB सामन्यातील हरणारा संघ Exit च्या वाटेवर; IPL 2024 Point Table चे समीकरण 

सामन्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याला समालोचकाने विचारले, तुम्ही सामना नेमका कुठे गमावला?

माझ्या मते शेवटच्या चेंडूवर आम्ही मॅच हरलो, असे उत्तर संजूने दिले आणि त्यावर समालोचक आश्चर्यचकित होऊन म्हणाला, खरंच...  

मग संजूने त्याला समजावून सांगितले की, याचे उत्तर देणे फार कठीण आहे. कर्णधार सामना हरतो आणि सामना कुठे हरला ते सांगावे हे जेव्हा सांगावे लागते, हे स्पर्धेतील सर्वात कठीण काम आहे. जेव्हा पराभवाच्या धक्क्यातून बाहेर येईन तेव्हा मी स्पष्टपणे सांगू शकेन. पण, या विजयाचे श्रेय गुजरात टायटन्सला द्यावे लागेल. हेच या स्पर्धेचे सौंदर्य आहे.

 "या पराभवातून शिकावे लागेल आणि पुढे जावे लागेल. मी फलंदाजी करत असताना मला वाटले की १८० धावा कडवे आव्हान देण्यासाठी पुरेशा आहेत. मला वाटले १९६ ही विजयी धावसंख्या आहे. दव नसल्यामुळे आमच्या बॉलिंग लाइनअपने धावांचा यशस्वी बचाव करायला हवा होता.  डावाची सुरुवात करणे सोपे नव्हते.  

टॅग्स :आयपीएल २०२४राजस्थान रॉयल्ससंजू सॅमसनगुजरात टायटन्स