१३ चेंडूंत चोपल्या ६२ धावा! बंगळुरूत क्विंटन डी कॉकचीच हवा, थोडक्यात हुकले शतक, Video

क्विंटन डी कॉकने पहिल्याच षटकात रिसे टॉप्लीचे ३ चौकारांनी स्वागत केले, त्यानंतर मोहम्मद सिराजला दोन खणखणीत षटकार खेचले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 08:57 PM2024-04-02T20:57:37+5:302024-04-02T20:57:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi  - Quinton de Kock Score 81 runs in 56 ball with 8 fours & 5 sixes, Watch Video  | १३ चेंडूंत चोपल्या ६२ धावा! बंगळुरूत क्विंटन डी कॉकचीच हवा, थोडक्यात हुकले शतक, Video

१३ चेंडूंत चोपल्या ६२ धावा! बंगळुरूत क्विंटन डी कॉकचीच हवा, थोडक्यात हुकले शतक, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi Updates - क्विंटन डी कॉक आणि मार्कस स्टॉयनिस यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. लखनौ सुपर जायंट्सला क्विंटनने दमदार सुरुवात करून दिली आणि त्याला लोकेश राहुल व स्टॉयनिस यांची उत्तम साथ लाभली. दोघांसोबत अर्धशतकी भागीदारी झळकावल्यानंतरही क्विंटनचा प्रहार सुरूच राहिला. २०२० नंतर त्याने प्रथमच आयपीएलमध्ये सलग दोन सामन्यांत अर्धशतक झळकावले. 

४ षटकं, ४ गोलंदाज! क्विंटन डी कॉकचा प्रहार; पण ग्लेन मॅक्सवेलने केला चमत्कार, Video


RCB चा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉकने पहिल्याच षटकात रिसे टॉप्लीचे ३ चौकारांनी स्वागत केले, त्यानंतर मोहम्मद सिराजला दोन खणखणीत षटकार खेचले. सिराजने आयपीएल २०२३ मध्ये पॉवर प्लेमध्ये ३०० चेंडूंत १२ षटकार दिले होते, परंतु यावेळी त्याने आतापर्यंत ७२ चेंडूंत ८ षटकार दिले आहेत. क्विंटन व लोकेशने ५.३ षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली, परंतु ग्लेन मॅक्सवेलने पुढच्या चेंडूवर लोकेशची विकेट घेतली. लोकेश १४ चेंडूंत २ षटकारांसह २० धावांवर माघारी परतला.  


टॉप्लीला पुन्हा गोलंदाजीवर आणले गेले आणि क्विंटनने त्यावर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मॅक्सवेलने क्विंटनचा झेल टाकला. क्विंटनने आयपीएलमध्ये आज ३००० धावांचा टप्पा ओलांडला आणि सर्वात कमी इनिंग्जमध्ये हा पल्ला पार करणारा तो ( ९९) पाचवा फलंदाज ठरला. ख्रिस गेलने ७५ इनिंग्जमध्ये या धावा केल्या आहेत. एबी डिव्हिलियर्स व फॅफ ड्यू प्लेसिस यांच्यानंतर आयपीएलमध्ये ३ हजार धावा करणारा तो तिसरा दक्षिण आफ्रिकन खेळाडू ठरला. सिराजने LSG ला दुसरा धक्का दिला. देवदत्त पडिक्कलचा ( ६)  यष्टिरक्षक अनुज रावतने परतीचा अफलातून झेल घेतला. LSG ने पहिल्या १० षटकांत २ बाद ८४ धावा केल्या. 

क्विंटनने ३६ चेंडूंत ट्वेंटी-२०तील ६० वे अर्धशतक पूर्ण केले. क्विंटनला मार्कस स्टॉयनिसची चांगली साथ मिळाली आणि या दोघांनी २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. मॅक्सवेलला १४व्या षटकात स्टॉयनिसने खेचलेला षटकार स्टँडच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचला. पण, मॅक्सवेलने पुन्हा फिरकीवर कमाल करताना स्टॉयनिसला ( २४) झेलबाद केले. मॅक्सवेलने ४-०-२३-२ अशी स्पेल टाकली. या विकेटनंतर लखनौच्या धावांचा वेग किंचित मंदावला. १७व्या षटकात टॉप्लीने RCB ला मोठे यश मिळवून दिले. क्विंटन ५६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ८१ धावांवर माघारी परतला. 

Web Title: IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi  - Quinton de Kock Score 81 runs in 56 ball with 8 fours & 5 sixes, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.