RCB vs LSG Live Update : ४ षटकं, ४ गोलंदाज! क्विंटन डी कॉकचा प्रहार; पण ग्लेन मॅक्सवेलने केला चमत्कार, Video

RCB चा संघ आज घरच्या मैदानावर LSGचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 07:59 PM2024-04-02T19:59:32+5:302024-04-02T19:59:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi - Consecutive Sixes from Quinton de Kock,  KL Rahul dismissed for 20 from 14 balls, LSG 1-53 in powerplay, Video | RCB vs LSG Live Update : ४ षटकं, ४ गोलंदाज! क्विंटन डी कॉकचा प्रहार; पण ग्लेन मॅक्सवेलने केला चमत्कार, Video

RCB vs LSG Live Update : ४ षटकं, ४ गोलंदाज! क्विंटन डी कॉकचा प्रहार; पण ग्लेन मॅक्सवेलने केला चमत्कार, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi Updates - RCB चा संघ आज घरच्या मैदानावर LSGचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीचा हा  बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील १००वा ट्वेंटी-२० सामना आहे. एकाच मैदानावर १०० ट्वेंटी-२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने आयपीएलमधील ७ शतकांपैकी ४ शतकं चिन्नास्वामी येथे झळकावली आहेत आणि एकाच स्टेडियमवर सर्वाधिक ३२७६ धावांचा विक्रमही त्याने याच मैदानावर केला आहे.  RCB ने आज प्लेइंग इलेव्हनमध्ये १ बदल केला. अल्झारी जोसेफच्या जागी रिले टॉप्ली खेळणार आहे. 


पॉवर प्लेमध्ये जास्त धावा देण्याची परंपरा RCB ने याही सामन्यात राखली. क्विंटन डी कॉकने पहिल्याच षटकात रिसे टॉप्लीचे ३ चौकारांनी स्वागत केले, त्यानंतर मोहम्मद सिराजच्या पहिल्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचले. अपेक्षेप्रमाणे ग्लेन मॅक्सवेलला RCB ने गोलंदाजीला आणले, कारण क्विंटनला त्याने बाद केले आहे. मॅक्सवेलने LSG च्या धावांचा वेग संथ केला. पण, पॉवर प्लेमध्ये क्विंटनला लोकेश राहुलने साथ दिली. मोहम्मद सिराजने आयपीएल २०२३ मध्ये पॉवर प्लेमध्ये ३०० चेंडूंत १२ षटकार दिले होते, परंतु यावेळी त्याने आतापर्यंत ७२ चेंडूंत ८ षटकार दिले आहेत.  


क्विंटन व लोकेशने ५.३ षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली, परंतु मॅक्सवेलने पुढच्याच चेंडूवर लोकेशची विकेट घेतली. लोकेश १४ चेंडूंत २ षटकारांसह २० धावांवर माघारी परतला आणि LSG ला ५३ धावांवर पहिला धक्का बसला. 

लखनौ सुपर जायंट्स - क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, लोकेश राहुल, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मयांक यादव, नवीन उल हक


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस, रजत पटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, रिसे टॉप्ली, मयांक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
 

Web Title: IPL 2024 : Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live Marathi - Consecutive Sixes from Quinton de Kock,  KL Rahul dismissed for 20 from 14 balls, LSG 1-53 in powerplay, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.