रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा Mumbai Indians चा निर्णय योग्य; दिग्गजाचा हार्दिकला पाठिंबा

IPL 2023 Rohit Sharma Captaincy - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या ऑक्शनला चार दिवस बाकी असताना मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या याची कर्णधारपदी निवड जाहीर केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 09:36 AM2024-02-14T09:36:17+5:302024-02-14T09:37:01+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024: Rohit Sharma is already 36 years old and also faces immense pressure, Mumbai Indians will benefit from relieving Rohit of captaincy, claims Sunil Gavaskar | रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा Mumbai Indians चा निर्णय योग्य; दिग्गजाचा हार्दिकला पाठिंबा

रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा Mumbai Indians चा निर्णय योग्य; दिग्गजाचा हार्दिकला पाठिंबा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2023 Rohit Sharma Captaincy ( Marathi News ) - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या ऑक्शनला चार दिवस बाकी असताना मुंबई इंडियन्सनेहार्दिक पांड्या याची कर्णधारपदी निवड जाहीर केली होती. मुंबई इंडियन्सला पाच जेतेपदं जिंकून देणाऱ्या रोहित शर्माकडून ही जबाबदारी काढून घेतल्याने चाहत्यांच्या रोषाचा सामना फ्रँचायझीला सामना करावा लागला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने दोनवेळा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात जेतेपदाचा चषक उंचावला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याला ट्रेड विंडोमध्ये पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले आणि रोहितला बाजूला करून हार्दिककडे कर्णधारपद दिले. भारतीय संघाचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढून घेतलं? Inside Story आली समोर


''हे बघा, ही फ्रँचायझी नेहमी भविष्याचा विचार करून निर्णय घेते. रोहित शर्मा हा आता ३६ वर्षांचा झाला आहे आणि भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटचा तो कर्णधार असल्याने त्याच्यावर प्रचंड दडपण आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने त्याच्यावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हार्दिक पांड्यासारख्या युवा खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे,''असे सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हणाले.


हार्दिकने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सकडे  १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला हार्दिकला संघात घेण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले. 


ते पुढे म्हणाले,''हार्दिक पांड्याकडे नेतृत्व देण्याचा मुंबई इंडियन्सला फायदा होणार आहे. त्याने रोहित शर्माला फलंदाज म्हणून मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळणार आहे. सलामीला रोहित खेळल्यानंतर ३ किंवा ५ व्या क्रमांकावर हार्दिक पांड्या फलंदाजी करेल आणि संघाला सातत्याने २०० पार धावा उभ्या करण्याचा प्रयत्न करेल.''

 

Web Title: IPL 2024: Rohit Sharma is already 36 years old and also faces immense pressure, Mumbai Indians will benefit from relieving Rohit of captaincy, claims Sunil Gavaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.