Join us  

Big News : हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्सला 'ठेंगा'; गुजरात टायटन्ससोबत कायम राहणार 

सर्वांचे लक्ष होते ते हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) बातमीकडे. २०१५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणारा पांड्या हा मुंबई इंडियन्सचा मुख्य खेळाडू होता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 5:31 PM

Open in App

IPL 2024 Retention:  इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी रिटेन व रिलीज खेळाडूंची ( म्हणजेच संघात कायम राखलेल्या व करारमुक्त केलेल्या) यादी आज जाहीर करण्यात आली. कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स यांनी अनुक्रमे १३ व ११ खेळाडूंना रिलीज केले. पण, सर्वांचे लक्ष होते ते हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) बातमीकडे. २०१५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणारा पांड्या हा मुंबई इंडियन्सचा मुख्य खेळाडू होता, परंतु २०२२ मध्ये त्याने गुजरात टायटन्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याने कॅप्टन्सीच्या पहिल्याच पर्वात गुजरात टायटन्सला जेतेपद पटकावून दिले. २०२३ मध्ये त्याने संघाला पुन्हा फायनलपर्यंत पोहोचवले होते, परंतु चेन्नई सुपर किंग्सने त्यांना पराभूत केले.

रिटेन लिस्टपूर्वी हार्दिक मुंबई इंडियन्सकडे जाणार अशी जोरदार चर्चा होती. पण, ती फोल ठरली.  हार्दिकने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत.  

गुजरात टायटन्सने कायम राखलेले खेळाडू -डेव्हडि मिलर, शुबमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धीमान सहा, केन विलियम्सन, हार्दिक पांड्या ( कर्णधार), अभिमन मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवातिया, मोहम्मद शणी, नूर अहमद, साई किशोर, राशीद खान, जोशूआ लिटल, मोहित शर्मा

गुजरात टायटन्सने रिलीज केलेले खेळाडू - यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडीन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासून शनाका.  

टॅग्स :आयपीएल २०२३हार्दिक पांड्यागुजरात टायटन्समुंबई इंडियन्सआयपीएल लिलाव