Join us  

अरेरे.. वाईट झालं! SRH विरूद्ध सामना तर हरलेच अन् RCBच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

IPL 2024: RCB vs SRH हा सामना गोलंदाजांसाठी वाईट स्वप्नाप्रमाणे ठरला. या सामन्यात फलंदाजांनी तब्बल ५४९ धावांचा पाऊस पाडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 12:27 PM

Open in App

IPL 2024 RCB vs SRH records: सोमवारचा दिवस गोलंदाजांसाठी अतिशय वाईट दिवस ठरला. RCB आणि SRH यांच्यात झालेल्या सामन्यात ४० षटकांमध्ये तब्बल ५४९ धावा चोपण्यात आल्या. ट्रेव्हिस हेडचे शतक (१०२) आणि त्याला हेनरिक क्लासेन (६७) व अब्दुल समदची (नाबाद ३७) मिळालेली साथ यांच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने २८७ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना, दिनेश कार्तिकच्या ८३ धावा तसेच फाफ डु प्लेसिसच्या ६२ आणि विराटच्या ४२ धावांच्या बळावर बंगळुरू संघानेही २६२ धावांपर्यंत मजल मारली. बंगळुरू संघाने सामना तर हारलाच पण त्यासोबत त्यांच्या नावावर एक विचित्र लाजिरवाणा विक्रम नोंदवण्यात आला.

या सामन्यात RCBच्या ४ गोलंदाजांनी एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला. विजयकुमार वैशाक, रीस टॉप्ली, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल हे चार गोलंदाज संघात होते. या चौघांनी सामन्यात २३५ धावा दिल्या. या चारही गोलंदाजांनी ५० हून अधिक धावा दिल्या. हा एक लाजिरवाणा विक्रम ठरला. केवळ IPLचं नव्हे तर T20 क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ ठरली, जेव्हा एकाच संघाच्या ४ गोलंदाजांनी एका सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा दिल्या.

  • सामन्यातील चारही गोलंदाजांची कामगिरी

रिस टॉप्ली- ६८ धावा (१ बळी)विजय वैशाक- ६४ धावालॉकी फर्ग्युसन- ५२ धावा (२ बळी)यश दयाल- ५१ धावा

याशिवाय, एका टी२० सामन्यात सर्वाधिक बाऊंड्री म्हणजे चौकार-षटकारही याच सामन्यात ठोकले गेले.

  • सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 2024 - ८१ बाऊंड्री (४३ चौकार + ३८ षटकार)
  • वेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन 2023 - ८१ (४६ चौकार + ३५ षटकार)
  • मुलतान सुलतान वि. क्वेटा ग्लॅडिएटर्स, रावळपिंडी 2023 (४५ चौकार + ३३ षटकार)
टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरटी-20 क्रिकेटसनरायझर्स हैदराबादविराट कोहली