पावसामुळे खेळ थांबला! मुंबई इंडियन्सचा फायदा की राजस्थान रॉयल्सचा? आला मोठा ट्विस्ट

यशस्वी जैस्वाल व जॉस बटलर यांनी दमदार सुरुवात करून दिली, परंतु पावसाने खोडा घातला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:13 PM2024-04-22T22:13:41+5:302024-04-22T22:13:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : RAIN STOPPED PLAY, RR is ahead of the game by 20 runs | पावसामुळे खेळ थांबला! मुंबई इंडियन्सचा फायदा की राजस्थान रॉयल्सचा? आला मोठा ट्विस्ट

पावसामुळे खेळ थांबला! मुंबई इंडियन्सचा फायदा की राजस्थान रॉयल्सचा? आला मोठा ट्विस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live Marathi : आयपीएल २०२४ मध्ये तिलक वर्मा व नेहाल या युवा डावखुऱ्या फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करताना MI ला ९ बाद १७९ धावांवर पोहोचवले. राजस्थानच्या संदीप शर्माने जबरदस्त पुनरागमन करताना पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर यशस्वी जैस्वाल व जॉस बटलर यांनी दमदार सुरुवात करून दिली, परंतु पावसाने खोडा घातला. 

तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले


ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकाच्या रोहित शर्माला ( ६) माघारी पाठवले. इशान किशन ( ०) आणि सूर्यकुमार यादव ( १०) यांना संदीप शर्माने बाद केले. मोहम्मद नबीला ( २३) कॉट अँड बोल्ड करून युझवेंद्र चहलने इतिहास घडवला. आणि  आयपीएल इतिहासात २०० विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला.  तिलक वर्मा व नेहाल यांनी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडल्या. नेहाल २४ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावांवर बाद झाला. तिलकने ४५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावा केल्या. तिलक व नेहाल यांनी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडल्या. संदीप शर्माने २०व्या षटकात तीन विकेट्स घेताना डावात १८ धावांत ५ विकेट्स पूर्ण केल्या. 

Impact player जॉस बटलर व यशस्वी जैस्वाल यांनी RR ला सकारात्मक सुरुवात करून दिली. फॉर्मात नसलेल्या यशस्वीला सूर गवसलेला दिसला. बटलर व जैस्वाल यांनी पॉवर प्लेमध्ये ६१ धावा उभ्या केल्या. कमकुवत गोलंदाजी ही MI साठी पुन्हा डोकेदुखी ठरताना दिसली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवला गेला अन् जर पुढे मॅच न झाल्यास RR विजयी ठरणार, कारण ते डकवर्थ लुईस नियमानुसार २० धावांनी पुढे आहेत. 

Web Title: IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : RAIN STOPPED PLAY, RR is ahead of the game by 20 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.