राजस्थान रॉयल्स पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध 'यशस्वी'! Play Off च्या दिशेने भरारी, MI मात्र... 

 राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सला दुसऱ्यांदा हरवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 11:45 PM2024-04-22T23:45:47+5:302024-04-22T23:46:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : HUNDRED FOR YASHASVI JAISWAL, RR second wing against MI in thease season! Heading towards the Play Offs, MI seventh in Point Table   | राजस्थान रॉयल्स पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध 'यशस्वी'! Play Off च्या दिशेने भरारी, MI मात्र... 

राजस्थान रॉयल्स पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध 'यशस्वी'! Play Off च्या दिशेने भरारी, MI मात्र... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live Marathi :  राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सला दुसऱ्यांदा हरवले. वानखेडे स्टेडियमवर वस्त्रहरण केल्यानंतर RR ने घरच्या मैदानावरही MI ला पराभवाची चव चाखवली. आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशाने नेहल वढेरा व तिलक वर्मा यांनी मुंबईला सन्मानजनक धावा उभ्या करून दिल्या. संदीप शर्माने ५ विकेट्स घेत मुंबईच्या धावांचा चांगलाच ब्रेक लावला. यशस्वी जैस्वालने आयपीएल २०२४ मधील पहिले शतक झळकावताना लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या RR च्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी दोन सोपे झेल टाकले आणि काही चौकारही सोडले. तेच मुंबईला महागात पडले. 


Impact player जॉस बटलर व यशस्वी जैस्वाल ७४ धावांची भागीदारी केली. पियुष चावलाने अनुभवाच्या जोरावर मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने जॉस बटलरला ३५ ( २५ चेंडू, ६ चौकार) धावांवर बाद केले. यशस्वीने ३१ चेंडूंत यंदाच्या पर्वातील त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. पियुषच्या गोलंदाजीवर यशस्वीने उत्तुंग फटका खेचला अन् नेहालला तो टिपता आला असता तर मुंबईला मोठी विकेट मिळाली असती. पण, सीमारेषेवर त्याने झेल टाकला अन् RR ला षटकार मिळाला.  मोहम्मद नबीकडून MI ला अपेक्षित गोलंदाजी होताना दिसली नाही आणि यशस्वी व संजू सॅमसनने ११व्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचले.

टीम डेव्हिडने १३व्या षटकात संजूचा सोपा झेल टाकला. यशस्वी आज भलत्याच फॉर्मात होता आणि त्याने जसप्रीत बुमराह यालाही उत्तुंग षटकार खेचला. यशस्वी व संजू यांनी ६५ चेंडूंत नाबाद १०९ धावा जोडताना राजस्थानाल १८.४ षटकांत १ बाद १८३ धावा उभारून दिल्या. राजस्थानने ९ विकेट्सने हा सामना जिंकून गुणतालिकेत ८ सामन्यांत ७ विजयासह १४ गुणांसोबत अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. मुंबई इंडियन्स ८ सामन्यांत ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत. यशस्वीने ६० चेंडूंत ९ चौकार व ७ षटकारांसह नाबाद १०४ धावा केल्या, तर संजू २८ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला. 

Image

तत्पूर्वी, रोहित शर्मा ( ६), इशान किशन ( ०) आणि सूर्यकुमार यादव ( १०) यांना RRच्या गोलंदाजांनी स्वस्तात माघारी पाठवले. मोहम्मद नबीला ( २३) बाद युझवेंद्र चहलने आयपीएलमधील ऐतिहासिक २०० वी विकेट मिळवली. तिलक वर्मा व नेहाल यांनी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडल्या. नेहाल २४ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावांवर बाद झाला. तिलकने ४५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावा केल्या. मुंबईने ९ बाद १७९ धावांपर्यंत मजल मारली. संदीप शर्माने २०व्या षटकात तीन विकेट्स घेताना डावात १८ धावांत ५ विकेट्स पूर्ण केल्या. 

Web Title: IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : HUNDRED FOR YASHASVI JAISWAL, RR second wing against MI in thease season! Heading towards the Play Offs, MI seventh in Point Table  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.