Join us  

Video : शुबमन गिलला राग अनावर, अम्पायरसोबत घातला वाद; BCCI करणार कारवाई?

संजू सॅमसन व रियान पराग यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना राजस्थान रॉयल्सला मजबूत धावसंख्या उभारून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 9:13 PM

Open in App

IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : संजू सॅमसन व रियान पराग यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना राजस्थान रॉयल्सला मजबूत धावसंख्या उभारून दिली. यशस्वी जैस्वाल व जॉस बटलर आज अपयशी ठरल्यानंतर गुजरात टायटन्सचे गोलंदाजा हवेत होते. पण, संजू व रियान यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आणि गुजरातचा कर्णधार शुबमन गिलची सटकली. गुजरातच्या खेळाडूंकडून ३-४ झेल टाकल्याचा फायदा RR ला झाला. शुबमनने यावेळी रागात अम्पायरसोबत हुज्जत घातली. 

यशस्वी जैस्वालने RR ला सकारात्मक सुरूवात करून दिली. पण, एक चुकीचा स्कूप मारण्याच्या प्रयत्नात त्याने २४ धावांवर विकेट फेकली. उमेश यादवच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक मॅथ्यू वेडने सुरेख झेल घेतला.  राशिद खानने त्याच्या पहिल्या षटकात जॉस बटलरला ( ८)  माघारी पाठवून RR ला मोठा धक्का दिला. संजूला दोन जीवदान मिळाले आणि रियान परागसह त्याने GT चे बारा वाजवले. रियान आक्रमक फटकेबाजी करताना दिसला, दरम्यान संजूने कर्णधार व यष्टिरक्षक म्हणून आयपीएलमध्ये १५०० धावा पूर्ण केल्या आणि असा पराक्रम करणारा तो महेंद्रसिंग धोनी व एडम गिलख्रिस्ट यांच्यानंतर तिसरा खेळाडू ठरला. शेन वॉर्न ( ५६) याच्यानंतर राजस्थान रॉयल्सचे ५० सामन्यांत नेतृत्व करणारा तो दुसरा कर्णधार ठरला.  

रियानने ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावले. रियान गुजरातच्या गोलंदाजांना जुमानत नव्हता आणि त्याच्या फटकेबाजीने संजूसह शतकी भागीदारी पूर्ण केली. १७व्या षटकात मोहित शर्माच्या चेंडूवर अम्पायरने वाईड निर्णय दिला आणि गुजरातने रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या अम्पायरने सुरुवातीला हा वाईड नसल्याचे सांगितले, परंतु क्षणात त्याने निर्णय बदलला व वाईड असल्याचे जाहीर केले. यावरून शुबमन संतापला अन् वाद घालताना दिसला. याआधीच्या सामन्यातही शुबमनने असाच राग व्यक्त केला होता आणि त्याच्या या वागण्यावर बीसीसीआय कारवाई करणारा का, हे पाहणे उत्सुकतेचं असेल. 

टॅग्स :आयपीएल २०२४शुभमन गिलराजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्स