Join us

Kavya Maran च्या अनुपस्थितीत कॅमेरामनने फोकस हलवला, जाणून घ्या कोण आहे ही सुंदरा

सनरायझर्स हैदराबादच आजचा सामना पाहण्यासाठी मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) स्टेडियमवर उपस्थित नव्हती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 22:48 IST

Open in App

IPL 2024 Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Live Marathi : सनरायझर्स हैदराबादच आजचा सामना पाहण्यासाठी मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) स्टेडियमवर उपस्थित नव्हती. तिची उपस्थिती नेहमीच कॅमेरामनचे लक्ष वेधणारी असते आणि तिची एक झलक चाहत्यांना आनंदीत करणारी ठरते. पण, पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत तिच्या गैरहजेरीत कॅमेराननने २६ वर्षीय तरुणीवर फोकस केला. सध्या तिचीच चर्चा सुरू आहे... 

SRH चे स्टार फलंदाज आज PBKS च्या गोलंदाजी समोर ढेपाळले.  २० वर्षीय फलंदाज नितीश कुमार रेड्डी  ( चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६४ धावा ) याने अब्दुल समदसह ( २५) २० चेंडूंत ५० धावा जोडून SRH ला सामन्यात पुन्हा आणले. हैदराबादने ९ बाद १८३ धावांचा डोंगर उभा केला. अर्शदीप सिंगने २९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. सॅम कुरन व हर्षल पटेल यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. PBKS ची सुरुवात काही खास झाली नाही. पॅट कमिन्स व भुवनेश्वर कुमार यांनी पहिल्या दोन षटकांत अनुक्रमे जॉनी बेअरस्टो ( ०) व प्रभसिमरन सिंग ( ४) यांना माघारी पाठवले. भुवीच्या पुढच्या षटकात शिखर धवनला जीवदान मिळाले, परंतु दोन चेंडूनंतर हेनरिच क्लासेनने अप्रतिम स्टम्पिंग करून PBKS ला मोठा धक्का दिला. गब्बर १४ धावांवर माघारी परतला.   सॅम कुरन ( २९) चांगली फटकेबाजी करत होता, परंतु टी नटराजनने त्याला बाद करून पंजाबची अवस्था ४ हाद ५८ अशी केली. मागच्या सामन्यातील नायक शशांक सिंग व सिकंदर रझा यांनी चांगला खेळ सुरू ठेवला होता. पण, जयदेव उनाडकटच्या चेंडूवर स्कूप मारण्याच्या प्रयत्नात सिकंदर ( २८) क्लासेनच्या हाती झेल देऊन परतला.  

काव्याच्या अनुपस्थितीत कोमलची चर्चा... कोमल शर्मा  ही हैदराबादचा फलंदाज अभिषेकची बहिण आहे. कोमल पेशाने डॉक्टर आहे आणि अभिषेक अनेकदा आपल्या बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अभिषेक शर्माला एक मोठी बहीण देखील आहे. तिचे नाव सानिया शर्मा आहे.

 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादकाव्या मारनपंजाब किंग्सऑफ द फिल्ड