Join us

SRH vs PBKS Live : भुवनेश्वर कुमारची चतुराई, हेनरिच क्लासेनची चपळाई! पाहा भन्नाट अन् दुर्मिळ विकेट, Video 

सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करून दाखवताना पंजाब किंग्सला मोठे धक्के दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 22:21 IST

Open in App

IPL 2024 Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Live Marathi : सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करून दाखवताना पंजाब किंग्सला मोठे धक्के दिले आहेत. PBKS चा कर्णधार शिखर धवन याला SRH चा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने चतुराईने बाद केले. त्याला यष्टिरक्षक हेनरिच क्लासेनच्या चपळाईने मदत केली. जलदगती गोलंदाजांला स्टम्पिंगने विकेट मिळाल्याची दुर्मिळ घटना या विकेटमुळे घडली. 

SRH चे स्टार फलंदाज आज PBKS च्या गोलंदाजी समोर ढेपाळले. ४ बाद ६४ धावा अशी अवस्था असताना २० वर्षीय फलंदाज नितीश कुमार रेड्डी  ( Nitish Kumar Reddy ) मैदानावर उभा राहिला. त्याने सोबतीला अब्दुल समदला घेतले आणि दोघांनी २० चेंडूंत ५० धावा जोडून SRH ला सामन्यात पुन्हा आणले. पण, अर्शदीप सिंगने २९ धावांत ४ विकेट्स घेताना पंजाबसाठी पुनरागमनाचे दरवाजे उघडून दिले. तरीही हैदराबादने ९ बाद १८३ धावांचा डोंगर उभा केला. समद १२ चेंडूंत २५ धावांवर बाद झाला. नितीशने ३७ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६४ धावा केल्या. सॅम कुरन व हर्षल पटेल यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेत SRH ला धक्के दिले. 

PBKS ची सुरुवात काही खास झाली नाही. पॅट कमिन्स व भुवनेश्वर कुमार यांनी पहिल्या दोन षटकांत अनुक्रमे जॉनी बेअरस्टो ( ०) व प्रभसिमरन सिंग ( ४) यांना माघारी पाठवले. भुवीच्या पुढच्या षटकात शिखर धवनला जीवदान मिळाले, परंतु दोन चेंडूनंतर हेनरिच क्लासेनने अप्रतिम स्टम्पिंग करून PBKS ला मोठा धक्का दिला. गब्बर १४ धावांवर माघारी परतला. सॅम कुरन ( २९) चांगली फटकेबाजी करत होता, परंतु टी नटराजनने त्याला बाद करून पंजाबची अवस्था ४ हाद ५८ अशी केली.    

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादपंजाब किंग्सभुवनेश्वर कुमार