Join us  

संजू सॅमसनमध्ये 'MS Dhoni' ची झलक; पंजाब किंग्सच्या स्टार फलंदाजाला पाठवले माघारी

राजस्थान रॉयल्स मागील सामन्यातील पराभवाच्या धक्क्यानंतर जरा जास्तच सावध झालेला दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 9:56 PM

Open in App

IPL 2024 Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Live : राजस्थान रॉयल्स मागील सामन्यातील पराभवाच्या धक्क्यानंतर जरा जास्तच सावध झालेला दिसला. यशस्वी जैस्वाल, जॉस बटलर व आर अश्विन हे तीन प्रमुख खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये नसूनही त्यांनी पंजाब किंग्सला कडवी टक्कर दिली. गोलंदाजांच्या अचूक माऱ्याला क्षेत्ररक्षकांनी मिळालेली साथ अप्रतिम होती. त्यात कर्णधार संजू सॅमसनने ( Sanju Samson ) महेंद्रसिंग धोनी स्टाईल रन आऊट करून PBKS ला मोठा धक्का दिला. 

पंजाब किंग्सला घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने संघर्ष करण्यास भाग पाडले. शिखर धवनच्या अनुपस्थितीत PBKS च्या फलंदाजांची फळी कमकुवत झाली होती. आवेश खान ( २-३४) व केशव महाराज ( २-२३) यांनी RR ला मोठे यश मिळवले दिले. जितेश शर्मा ( २९) व लिएम लिव्हिंगस्टोन ( २१) यांनी पंजाबला सावरले. त्यानंतर आशुतोष शर्माने १६ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३१ धावा चोपून संघाला ८ बाद १४७ धावांपर्यंत पोहोचवले. अथर्व तायडे ( १५), जॉनी बेअरस्टो ( १५) व प्रभसिमरन सिंग ( १०) यांना मोठी खेळी करण्यापासून युझवेंद्र चहल व अन्य गोलंदाजांनी रोखले. ट्रेंट बोल्ट, चहल व कुलदीप सेन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील टेबल टॉपर राजस्थान रॉयल्स पुन्हा विजयी लय मिळवण्यासाठी पंजाब किंग्सचा सामना करत आहेत. PBKS ५ सामन्यांत २ विजयांसह तालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत आणि त्यांना स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर RR विरुद्ध आज विजय आवश्यक आहे. आजच्या सामन्यात RR ने सर्व आघाड्यांवर दबदबा राखला. संजू व आवेश खान यांच्यातला ताळमेळ चुकल्याने सुटलेला झेल वगळल्यास आज राजस्थान भारी पडले. त्यात संजू सॅमसन याने केलेला अप्रतिम रन आऊट सामन्यातील हायलाईट ठरला.   पहिल्या डावानंतर केशव महाराज म्हणाला, चहल अभूतपूर्व आहे आणि त्याच्यासोबत गोलंदाजी करणे ही माझे भाग्य आहे.  खेळफट्टी शेवटी चांगले होऊ लागली होती. त्यावर सुरवातीला थोडी स्तब्धता होती.  आशा आहे की आम्ही पंजाबला पुरेशा धावसंख्येवर रोखले आणि आम्ही लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करू शकू, अशी आशा आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२४राजस्थान रॉयल्सपंजाब किंग्ससंजू सॅमसन