Join us  

कन्फ्युजन ही कन्फ्युजन! संजू सॅमसन-कुलदीप सेन एकाच कॅचसाठी गेले; आवेश खानचे डोके फिरले 

RR ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी योग्य ठरवला. पंजाबचे ४ फलंदाज ५२ धावांवर तंबूत परतले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 8:25 PM

Open in App

IPL 2024 Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील टेबल टॉपर राजस्थान रॉयल्स पुन्हा विजयी लय मिळवण्यासाठी पंजाब किंग्सचा सामना करत आहेत. PBKS ५ सामन्यांत २ विजयांसह तालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत आणि त्यांना स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर RR विरुद्ध आज विजय आवश्यक आहे. RR ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो गोलंदाजांनी योग्य ठरवला. पंजाबचे ४ फलंदाज ५२ धावांवर तंबूत परतले आहेत.

 यशस्वी जैस्वाल, जॉस बटलर व आऱ अश्विन यांना विश्रांती द्यावी लागली आहे. त्यांच्याजागी रोव्हमन पॉवेल व तनुष कोटियन प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळत आहेत. PBKS चा कर्णधार शिखर धवन आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. अथर्व तायडे व लिएम लिव्हिंगस्टोन पंजाबकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळतील.  अथर्वने ( १५) दमदार सुरुवात तर केली, परंतु आवेश खानने त्याची विकेट मिळवली. कुलदीप सेन व संजू सॅमसन हे दोघंही एका कॅचसाठी धावले. नशीबाने कुलदीपने चेंडू हातात पकडला अन् राजस्थानला विकेट मिळाली. मात्र, आवेश खान संतापला होता. 

जॉनी बेअरस्टो मैदानावर उभा होता, परंतु त्याच्या धावांचा वेग संथ ठेवण्यात RR च्या गोलंदाजांना यश आले. प्रभसिमरन सिंगला ( १०) युझवेंद्र चहलने माघारी पाठवून पंजाबला ४१ धावांवर दुसरा धक्का दिला. बेअरस्टो 'भरवशाच्या म्हशीला टोणगा' ठरला. केशव महाराजच्या पहिल्याच षटकात बेअरस्टो ( १५) शिमरोन हेटमायरच्या हाती सोपा झेल देऊन परतला.  महाराजने त्याच्या पुढच्या षटकात पंजाबचा कर्णधार सॅम कुरनला ( ६) माघारी पाठवून चौथा धक्का दिला. 

  • युजवेंद्र चहलला २०० IPL विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी तीन विकेट्सची गरज आहे.
  • जॉनी बेअरस्टोला आयपीएलमध्ये १५० चौकार पूर्ण करण्यासाठी सहा चौकारांची गरज आहे.
  • सॅम कुरनला आयपीएलमध्ये ५० विकेट पूर्ण करण्यासाठी दोन विकेट्सची गरज आहे.
  • संजू सॅमसनला आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण करण्यासाठी आठ षटकारांची गरज आहे.  
टॅग्स :आयपीएल २०२४राजस्थान रॉयल्सपंजाब किंग्ससंजू सॅमसन