IPL 2024 POINTS TABLE - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातल्या इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील सामन्यात ५४९ धावा चोपल्या गेल्या, ४३ चौकार व ३८ षटकारांची आतषबाजी झाली. SRH च्या ३ बाद २८७ धावांचा ( आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम) पाठलाग करताना RCB ने ७ बाद २६२ धावांपर्यंत ( ट्वेंटी-२० क्रिकेटमधील लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वोत्तम धावा) मजल मारली. पण, या पराभवानंतर RCB ची गाडी गुणतालिकेत पुन्हा तळाच्या क्रमांकावर घसरली आहे. त्यामुळे प्ले ऑफचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले असे जर कुणाला वाटत असेल तर जरा थांबा...
५४९ धावा, ४३ चौकार, ३८ षटकार! १३ हजाराहून अधिक ट्वेंटी-२०त जे घडलं नव्हतं ते RCB ने केलं
राजस्थान रॉयल्स १० गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत करून उभे आहेत. ६ पैकी ५ सामने जिंकून RR ने त्यांचा बाद फेरीचा मार्ग सुकर केला आहे आणि त्यांना उर्वरित ८ सामन्यांत किमान ३ विजय हे बाद फेरीसाठी पुरेसे आहेत. राजस्थानप्रमाणे गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स व सनरायझर्स हैदराबाद यांचे प्रत्येकी ६ सामने खेळून झाले आहेत. LSG व GT ने ३ विजय व ३ पराभव पत्करले आहेत आणि त्यांना उर्वरित ८ सामन्यांत १६ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी पाच विजय आवश्यक आहेत.

SRH ने ६ पैकी ४ गुण मिळवून तालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांना १६ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी उर्वरित ८ सामन्यांत ४ विजय पुरेशे आहेत. पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स हे ६ सामन्यांत दोनच विजय मिळवू शकले आहेत. त्यांना आता ८ पैकी ६ सामने जिंकावे लागतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ मध्ये १ विजय मिळवला आहे आणि त्यांना उरलेले सर्वच्या सर्व ७ सामने जिंकावे लागणार आहेत.