Join us

Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज नॉक आऊट सामना धर्मशाला येथे होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 20:18 IST

Open in App

IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi : पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज नॉक आऊट सामना धर्मशाला येथे होत आहे. PBKS व RCB हे दोन्ही संघ ११ सामन्यांत ४ विजय मिळवून प्रत्येकी ८ गुणांसह अनुक्रमे आठव्या व सातव्या क्रमांकावर आहे. आज जो संघ पराभूत होईल, त्याचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे आव्हानही संपुष्टात येईल आणि मुंबई इंडियन्सनंतर स्पर्धेबाहेर होणारा तो दुसरा संघ ठरेल. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रयत्नशील असतील. पंजाबने काही सामने थोडक्यात गमावले आणि त्याचा फटका त्यांना बसतोय. तेच बंगळुरूची कामगिरी ही विराट कोहली केंद्रीतच राहिली आहे. तो धावा करतो, परंतु त्याला सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही. त्यामुळे स्पर्धेत राहायचे असेल तर त्यांना संघ म्हणून यापुढे खेळावे लागेल.

कागिसो रबाडाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये विराट व फॅफ ड्यू प्लेसिस यांना प्रत्येकी ४ वेळा बाद केले आहे. कोहलीचा त्याच्या विरुद्ध स्ट्राईक रेट हा १०६.२५ असा, तर फॅफचा १४०.४२ असा राहिला आहे. पंजाबचा कर्णधार सॅम करन याने टॉस जिंकून RCB ला प्रथम फलंदाजीला बोलावले. PBKS ने कागिसो रबाडाला बसवून लिएम लिव्हिंगस्टनला बसवले, तर RCB ने ग्लेन मॅक्सवेलच्या जागी ल्युकी फर्ग्युसनला संधी दिली. RCB चा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( ९) आणि विल जॅक्स ( १२) यांना आज मोठी खेळी करण्यापासून विद्वथ कावेरप्पाने ( Vidwath Kaverappa) रोखले. PBKS च्या खेळाडूंनी पॉवर प्लेमध्ये विराट कोहलीला दोन जीवदान दिले. रजत पाटीदार याचाही एक झेल टाकला. कोण आहे विद्वथ कावेरप्पा?विद्वथ कावेरप्पा हा  देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून  खेळतो.  त्याने ३ मार्च २०२२ रोजी पुद्दुचेरी विरुद्ध कर्नाटककडून व्यावसायिक आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले . ११ ऑक्टोबर २०२२ रोजी कर्नाटककडून महाराष्ट्राविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दुलीप ट्रॉफीच्या शेवटच्या मोसमात विद्वथची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. त्याने एकाच स्पेलमध्ये चेतेश्वर पुजारा, सर्फराज खान आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केले होते.  

दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ७ फलंदाजांना बाद केले होते. रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीतील विदर्भविरुद्धच्या सामन्यात त्याने १० बळी घेतले. कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील गोनीकोप्पल येथील रहिवासी असलेल्या विद्वथ याच्या गोलंदाजीत फारसा वेग नसला तरी तो लाईन लेन्थमुळे फलंदाजांना खूप त्रास देतो. क्रिकेटला गांभीर्याने घेण्यापूर्वी विद्वथने हॉकीच्या क्षेत्रातही हात आजमावला होता. वयाच्या १८ व्या वर्षी विद्वतने वेगवान गोलंदाजीला गांभीर्याने सुरुवात केली. कुर्गहून ते बंगळुरूला आला.  

टॅग्स :आयपीएल २०२४पंजाब किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरएफ ड्यु प्लेसीस