Join us  

IPL 2024: 'मुंबई इंडियन्स'च्या संघात केला जाणार बदल? पंजाबविरूद्ध अशी असू शकते Playing XI

IPL 2024, PBKS vs MI Playing 11 Prediction: मुंबईच्या संघाला गेल्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 9:57 AM

Open in App

IPL 2024, PBKS vs MI Playing 11 Prediction: आज पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मल्लापूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सध्या पॉइंट टेबलमध्ये पंजाब आणि मुंबई जवळपास बरोबरीवर आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यापैकी 2 जिंकून 4 पराभव पचवले आहेत. गब्बरच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ 8व्या तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ 9व्या स्थानी आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांची प्लेईंग ११ कशी असेल जाणून घेऊया.

पंजाब किंग्स गब्बरशिवाय मैदानात उतरणार

शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तो अजून बरा झालेला नाही. अशा स्थितीत त्याच्या जागी सॅम करन कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. गब्बरच्या अनुपस्थितीत पंजाब संघाला विजयासाठी पूर्ण प्रयत्न करावे लागतील. सध्या पंजाब संघात शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा हे उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. त्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघात बदल नाही

मुंबईच्या संघाने सुरुवातीला तीन सामन्यात पराभव स्वीकारला. त्यानंतर दोन सामने सलग जिंकून दाखवले. पण सहाव्या सामन्यात घरच्या मैदानावर मुंबईला CSK कडून पराभूत व्हावे लागले. त्या सामन्यात सर्वच खेळाडूंची कामगिरी उत्तम होती. त्यामुळे हार्दिक पांड्या संघात बदल करण्याची शक्यता फारच कमी आहे.

पंजाब आणि मुंबई यांच्यात तुल्यबळ स्पर्धा

मुंबई आणि पंजाब यांच्यात नेहमीच रोमांचक लढत झाली आहे. आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये मुंबईने 16 तर पंजाबने 15 सामने जिंकले आहेत. गेल्या 5 सामन्यांची आकडेवारी पाहता, पंजाबने 3 सामने जिंकत आघाडी घेतली आहे.

असा असू शकतो आजचा संघ

मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल आणि जेराल्ड कोएत्झी. (इमॅक्ट प्लेयर- सूर्यकुमार यादव)

पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सॅम करन (कर्णधार), लियम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि कागिसो रबाडा.

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सरोहित शर्माहार्दिक पांड्याशिखर धवनपंजाब किंग्स