'ओह गुरु, हो जा शुरू'! नवज्योतसिंग सिद्धू यांची IPL मध्ये एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार...

काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू IPL 2024 मधून कमबॅक करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 02:20 PM2024-03-19T14:20:54+5:302024-03-19T14:22:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Navjot Singh Sidhu's entry in IPL, will be seen in new role | 'ओह गुरु, हो जा शुरू'! नवज्योतसिंग सिद्धू यांची IPL मध्ये एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार...

'ओह गुरु, हो जा शुरू'! नवज्योतसिंग सिद्धू यांची IPL मध्ये एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 :भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी 'अच्छे दिन' आले आहेत. याचे कारण म्हणजे, येत्या दोन दिवसांत IPL चा नवा हंगाम सुरू होत आहे. दरवर्षी प्रमाणे या नवीन हंगामत क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल. दरम्यान, या IPL मधऊन काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू (Navjotsingh Sidhu) कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटपासून दुरावलेले सिद्धू येत्या 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL मध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहेत.

आयपीएलचा पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. दरम्यान, IPL ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडियाद्वारे नवज्योतसिंग सिद्धू यांना कॉमेंट्री पॅनलमध्ये सामील केल्याची पुष्टी केली. स्टार स्पोर्ट्सने ट्विट केले की, 'अत्यंत हुशार, महान नवज्योतसिंग सिद्धू आमच्या पॅनलमध्ये सामील झाले आहेत. त्यांची अप्रतिम कॉमेंट्री आणि शानदार वन लाइनर्स चुकवू नका.' सिद्धी यांच्या आगळ्या-वेगळ्या कॉमेंट्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कॉमेंट्री करताना पाहणे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वनी असेल.

विशेष म्हणजे, नवज्योतसिंग सिद्धू त्यांच्या खेळाच्या दिवसांमध्ये खूप शांत क्रिकेटर होते. परंतु कॉमेंट्रीमध्ये आल्यानंतर त्यांचा नवीन अवतार पाहयला मिळाला. सिद्धू यांची क्रिकेटची समज आणि ते सादर करण्याची शैली लोकांना खुप आवडली. याच कारणामुळे नवज्योतसिंग सिद्धू हे सर्वोच्च भारतीय समालोचकांपैकी एक मानले जातात.

नवज्योतसिंग सिद्धूंची क्रिकेट कारकीर्द
सिद्धू यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 15 वर्षे चालली. 1983 ते 1998 पर्यंत त्यांनी भारतीय संघाची सेवा केली. या काळात सिद्धूंनी 51 कसोटी आणि 136 एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी कसोटीत 3203 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 4413 धावा केल्या. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी 15 शतके आणि 48 अर्धशतकेही केली आहेत.

Web Title: IPL 2024, Navjot Singh Sidhu's entry in IPL, will be seen in new role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.