Join us  

शाब्बास DK, वर्ल्ड कप खेलना है अभी! रोहित शर्माने Live Match मध्ये दिनेश कार्तिकला डिवचले

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजे भरपूर मनोरंजन... त्यात रोहित शर्माच्या संघाची मॅच असेल तर मजा येणारच..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 10:28 PM

Open in App

IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग म्हणजे भरपूर मनोरंजन... त्यात रोहित शर्माच्या संघाची मॅच असेल तर मजा येणारच.. आज वानखेडे स्टेडियमवर जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेऊन मैदान गाजवले खरे, परंतु फॅफ ड्यू प्लेसिस, रजत पाटीदार व दिनेश कार्तिक यांनी मैदान मारले. तिघांच्या अर्धशतकाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठी धावसंख्या उभी करून दिली. आयपीएल २०२४ मधील कामगिरीच्या जोरावर प्रत्येक भारतीय खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान पटकावण्यासाठी खेळतोय.. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्धा पाहायला मिळतेय. त्यात ३८ वर्षीय दिनेशची फटकेबाजी आज युवकांना लाजवणारी होती. 

विराट कोहलीचा पारा चढला...! Umpire ने दिले ४ वादग्रस्त निर्णय, नेटकरी प्रचंड संतापले  

विराट कोहली ( ३) व पदार्पणवीर विल जॅक्स ( ८) हे अपयशी ठरले तरी रजत पाटीदार, कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व दिनेश कार्तिक यांनी RCB ला मोठी धावसंख्या उभारून दिली. ड्यू प्लेसिस ( ६१) व रजत ( ५०) यांनी ८२ धावा जोडून संघाचा डाव सारवला. ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली. कार्तिकने २३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा करून संघाला ८ बाद १९६ धावांपर्यंत पोहोचवले. या फटकेबाजीत MI चा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहा चमकला आणि त्याने ४ षटकांत २१ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये त्याने दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या.  

कार्तिकने आज काही सुरेख फटके खेचले. त्याने आकाश मढवालच्या एका षटकात थर्ड मॅनच्या दिशेने चार चौकार खेचले. हे पाहून स्लीपमध्ये उभा असलेला रोहित शर्मा प्रभावित झाला. त्याने DK उर्फ दिनेश कार्तिकची फिरकी घेतली आणि त्याची ही गंमत स्टम्प माईकमध्ये कैद झाली. रोहित म्हणाला. शाब्बास DK, वर्ल्ड कप खेलना है अभी... 

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि रोहित वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे रोहित आता मस्करी करतोय की खरंच त्याने DK ला वर्ल्ड कपसाठी तयार राहायला सांगितले आहे, हे लवकरच समजेल. याने रिषभ पंत व इशान किशन यांचे टेंशन नक्की वाढले.  

 

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्सरोहित शर्मादिनेश कार्तिक