Join us  

MI vs RCB Live : मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस, एकाची केली बदली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात ३ मोठे बदल 

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 7:14 PM

Open in App

IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजीचे आव्हान स्वीकारताना प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. 

RCB ने हुकूमी एक्का काढलाच... मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याचं वाढवलं टेंशन

वानखेडे स्टेडियम  मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज भिडत आहेत. MI व RCB या दोन्ही संघांना आतापर्यंत एकच विजय मिळवता आलेला आहे, परंतु मुंबई ( ४) एक सामना कमी खेळलेले आहेत.  आरसीबीने आज विल जॅकला पदार्पणाची कॅप दिली. २५ वर्षीय विलसाठी RCB ने लिलावात ३.२ कोटी रुपये मोजले.  इंग्लंडच्या ऑल राऊंडरने ट्वेंटी-२०त १५७ सामन्यांत ३ शतकं व ३० अर्धशतकांसह ४१३० धावा केल्या आहेत. MI चा कर्णधार हार्दिक पांड्या याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पियूष चावलाच्या जागी आज MI च्या ताफ्यात श्रेयस गोपाळ खेळणार आहेत. RCB च्या ताफ्यात ३ बदल केले गेले आहेत. विल जॅक, महिपाल लोम्रोर व वियजकुमार व्यैशाक यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

स्टॅट्स

  • वानखेडेमध्ये एमआयचे ४९ विजय आहेत
  • श्रेयस गोपाल त्याचा ५० वा आयपीएल सामना खेळत आहे
  • SKY ला त्याच्या IPL प्रवासात ३५० चौकार मारण्यासाठी एक चौकार आवश्यक आहे
  • SKY ला T20 मध्ये ३०० षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी सहा षटकारांची गरज आहे
  • SKY ला T20 मध्ये ७०० चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी तीन चौकारांची गरज आहे.  
  • मोहम्मद नबी याला टी-२० मध्ये ४०० चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी दोन चौकारांची गरज आहे
  • श्रेयस गोपालला (४९) आयपीएलमध्ये ५० बळींचा टप्पा गाठण्यासाठी एका विकेटची गरज आहे.
टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर