MI vs RCB १९७ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १५.३ षटकांत पार केले! वानखेडेचे मैदान गाजवले

इशान किशन व रोहित शर्मा यांनी MI ला आक्रमक सुरूवात करून दिल्यानंतर सूर्यकुमार यादवने १७ चेंडूंत फिफ्टी ठोकून RCB च्या विजयाच्या आशा मावळून टाकल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:15 PM2024-04-11T23:15:22+5:302024-04-11T23:15:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : MI chase target of 197 runs in 15.3 overs! MUMBAI INDIANS BEAT RCB BY 7 WICKETS | MI vs RCB १९७ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १५.३ षटकांत पार केले! वानखेडेचे मैदान गाजवले

MI vs RCB १९७ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १५.३ षटकांत पार केले! वानखेडेचे मैदान गाजवले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १९७ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १५.३ षटकांत सहज पार केले. इशान किशन व रोहित शर्मा यांनी MI ला आक्रमक सुरूवात करून दिल्यानंतर सूर्यकुमार यादवने १७ चेंडूंत फिफ्टी ठोकून RCB च्या विजयाच्या आशा मावळून टाकल्या. आज प्रत्येक चेंडू सीमापार पाठवायचा याच निर्धाराने MI चे फलंदाज मैदानावर उतरलेले दिसले. सूर्याने 360 डिग्री फटकेबाजी करून चाहत्यांचे मन जिंकले. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर मात्र जसप्रीत बुमराह ५ विकेट्स घेऊन हिरो ठरला. 


विराट कोहली ( ३) व पदार्पणवीर विल जॅक्स ( ८) हे अपयशी ठरले तरी रजत पाटीदार, कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व दिनेश कार्तिक यांनी RCB ला मोठी धावसंख्या उभारून दिली. ड्यू प्लेसिस ( ६१) व रजत ( ५०) यांनी ८२ धावा जोडून संघाचा डाव सारवला. ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली. कार्तिकने २३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा करून संघाला ८ बाद १९६ धावांपर्यंत पोहोचवले.  जसप्रीत बुमराहाने४ षटकांत २१ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या.


मुंबई इंडियन्सला इशान किशन व रोहित शर्मा यांनी स्फोटक सुरुवात करून दिली. इशानने २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना RCB च्या गोलंदाजांना चोपले. MI  ने ८.३ षटकांत फलकावर १०० धावा चढवल्या. पण, त्याच षटकात ही भागीदारी तुटली. इशान ३४ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावांवर विराटच्या हाती झेलबाद झाला. आकाश दीपने MI ला १०१ धावांवर पहिला धक्का दिला.  इशानच्या विकेटनंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या सूर्यकुमार यादवनेही हात मोकळे केले आणि आकाश दीपच्या षटकात त्याने ४,०,६,२,६,६ अशा २४ धावा चोपल्या. रोहितनेही विल जॅक्सच्या फिरकीवर फटकेबाजी सुरू केली, परंतु रिले टॉप्लीने अविश्वसनीय झेल घेत रोहितला माघारी पाठवले. 


हिटमॅनने २४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने मैदानावर येताच पहिला चेंडू सीमापार पाठवला. सूर्या RCB च्या गोलंदाजांना निर्दयीपणे चोपत होता आणि विराट व फॅफ चेंडू सीमापार जाताना नुसते पाहत उभे होते. सूर्याने १७ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. पण, सूर्या १९ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५२ धावांवर बाद झाला. मुंबईने १५.३ षटकांत ३ बाद १९९ धावा करून मॅच जिंकली. हार्दिकने ६ चेंडूंत नाबाद २१ धावा चोपल्या, तर तिलक वर्मा १६ धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : MI chase target of 197 runs in 15.3 overs! MUMBAI INDIANS BEAT RCB BY 7 WICKETS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.