Join us  

मुंबई इंडियन्सने ६१ चेंडू डॉट खेळले, 'Golden Duck' ठरले! राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसमोर ढेपाळले

ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई इंडियन्सची आघाडीची फळी ढेपाळली आणि त्यानंतर युझवेंद्र चहलच्या फिरकीने यजमानांची कोंडी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 9:18 PM

Open in App

IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update Marathi : ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई इंडियन्सची आघाडीची फळी ढेपाळली आणि त्यानंतर युझवेंद्र चहलच्या फिरकीने यजमानांची कोंडी केली. आघाडीचे ३ फलंदाज 'गोल्डन डक'वर बोल्टने माघारी पाठवले. कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) तिलक वर्मासह डाव सावरला, परंतु राजस्थान रॉयल्सचे डावपेच यशस्वी ठरले. संजू सॅमसन, रोव्हमन पॉवेल व शिमरोन हेटमायर यांच्या अफालतून झेल्सनी RRच्या गोलंदाजांना यश मिळवून दिले. 

Video : मुंबई इंडियन्सच्या फॅन्सकडून पांड्याचे 'हार्दिक' स्वागत नाहीच; कर्णधाराचा चेहरा पडला

४ फलंदाज अवघ्या २० धावांवर गमावल्यानंतर पांड्या व तिलक  यांनी अर्धशतकी भागीदारी करून राजस्थान रॉयल्सला आव्हान दिले होते. पण, दोन अफलातून झेलने पुन्हा पारडे राजस्थानच्या बाजूने झुकले.  रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस ( इम्पॅक्ट खेळाडू) हे तिघेही ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर गोल्डन डकवर माघारी परतले. इशान किशनने ( १६) काही चांगले फटके मारले, परंतु नांद्रे बर्गरने चौथा धक्का दिला. हार्दिक व तिलक यांची ३५ चेंडूंवर ५६ धावांची भागीदारी युझवेंद्र चहलने तोडली. हार्दिक २१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ३४ धावांवर झेलबाद झाला. 

MI ने पियूष चावलाला फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवले. पण, आवेश खानच्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात चावला ( ३) बाद झाला. शिमरोन हेटमायरने अफलातून झेल घेतला. चहलच्या पुढच्या षटकात आर अश्विनने दमदार झेल घेत तिलक वर्माला ( ३२) माघारी पाठवले. चहलने फिरकीची कमाल दाखवताना गेराल्ड कोएत्झीला ( ४) चूक करण्यास भाग पाडले. बोल्टने ४-०-२२-३ अशी आणि चहलनेही ४-०-११-३ असी उल्लेखनीय स्पेल टाकली. आयपीएलमध्ये सर्वाधिक २० वेळा सामन्यात ३ विकेट्स घेण्याच्या जसप्रीत बुमराहच्या विक्रमाशी चहलने बरोबरी केली. टीम डेव्हिड ( १७) अपयशी ठरला आणि बर्गरने त्याला बाद केले. 

मुंबई इंडियन्सला २० षटकांत ९ बाद  १२५ धावा करता आल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स