जसप्रीत बुमराहचा 'गेम चेंजर' Yorker, पृथ्वी शॉ फिरला गरगर; IPL 2024 मधील सर्वोत्तम चेंडू

मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील पहिल्या विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 06:52 PM2024-04-07T18:52:48+5:302024-04-07T18:53:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : WHAT A YORKER FROM JASPRIT BUMRAH, Prithvi Shaw clean bowled, Video  | जसप्रीत बुमराहचा 'गेम चेंजर' Yorker, पृथ्वी शॉ फिरला गरगर; IPL 2024 मधील सर्वोत्तम चेंडू

जसप्रीत बुमराहचा 'गेम चेंजर' Yorker, पृथ्वी शॉ फिरला गरगर; IPL 2024 मधील सर्वोत्तम चेंडू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील पहिल्या विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख बचावताना दिल्ली कॅपिटल्सच्या धावांवर अंकुश राखले आहे. पृथ्वी शॉ व अभिषेक पोरेल या फलंदाजांनी मुंबईचे टेंशन वाढवले होते. पण, जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) आयपीएल २०२४ मधील सर्वोत्तम यॉर्करपैकी एक टाकून पृथ्वीचा दांडा उडवला आणि सामना फिरवला. 

अरे देवा...! हार्दिक पांड्याला नेटिझन्सने पुन्हा धुतले, वाचा आता कोणते निमित्त ठरले... 


रोहित शर्मा ( ४९) व इशान किशन ( ४२) यांना अक्षर पटलेने बाद करून मुंबईला मोठे धक्के दिले. सूर्यकुमार यादव ( ०) व तिलक वर्मा ( ६) हे अपयशी ठरले. कर्णधार हार्दिक ( ३९) व डेव्हिडने ६० धावांची भागीदारी करून दिल्लीला आव्हान दिले.  रोमारियो शेफर्डने शेवटच्या षटकात ४,६,६,६,४,६ अशा ३२ धावा कुटल्या.  MI ने शेवटच्या ४ षटकांत ८४ धावा चोपल्या आणि ५ बाद २३४ धावा उभ्या केल्या. डेव्हिडने २१ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४५ धावा केल्या, तर शेफर्टने १० चेंडूंत ३९ धावांची नाबाद खेळी केली. 


शेफर्डने त्याच्या पहिल्याच षटकात दिल्लीला धक्का देताना डेव्हिड वॉर्नरला ( १०) चतुराईने माघारी पाठवले. पृथ्वी शॉ आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा डाव सावरला. पृथ्वीने त्याच्या घरच्या मैदानावर ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दिल्लीने १० षटकांत १ बाद ९४ धावा उभ्या केल्या आणि त्यांना शेवटच्या १० षटकांत १४१ धावा करायच्या होत्या.  पोरेल व पृथ्वी यांची ८८ ( ४९) धावांची भागीदारी जसप्रीत बुमराहने तोडली. पृथ्वी ४० चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांवर यॉर्कवर त्रिफळाचीत झाला.  


बुमराहने त्याच्या पुढच्या षटकात आणखी एक सेट फलंदाज पोरेल ( ४१) याला बाद करून दिल्लीला मोठा धक्का दिला. पृथ्वीच्या विकेटनंतर रिषभ पंत येणे अपेक्षित होते, पंरतु त्रिस्तान स्तब्सला पाठवण्याची रणनीती सर्वांना आश्चर्यचकित करणारी होती. पण, स्तब्सने चांगली फलंदाजी केली. 

Web Title: IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : WHAT A YORKER FROM JASPRIT BUMRAH, Prithvi Shaw clean bowled, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.