Join us  

MI vs CSK Live : हार्दिक पांड्याची MS Dhoni ला मिठी! पण, टॉस जिंकून MI ने केली CSK ची कोंडी

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातला एल क्लासिको सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 7:05 PM

Open in App

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातला एल क्लासिको सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. CSK ने पाच पैकी ३ सामने जिंकले आहेत, तर MI ला ५ मध्ये २ विजय मिळवता आले आहेत. हे दोन्ही विजय मुंबईने घरच्या मैदानावरील मागील दोन सामन्यांत मिळवले आहेत. तेच चेन्नईला प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर यंदाच्या पर्वात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात निकाल काय लागतो, याची उत्सुकता आहे. 

IPL 2024 Point Table : ८ पैकी ३ विजय अन् RR प्ले ऑफमध्ये; पण उरलेल्या ३ जागांसाठी कडवी टक्कर, मुंबईची तर...

आयपीएल इतिहासात प्रथमच CSK vs MI सामन्यात ना धोनी कर्णधार आहे, ना रोहित... हार्दिक पांड्या व  ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली MI व CSK ने या पर्वाची नवी सुरुवात केली आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्माला एक विक्रम खुणावतोय... त्याने १० धावा केल्यास तो MI vs CSK सामन्यांत सर्वाधिक धावांचा सुरेश रैनाच्या ( ७१०) विक्रमाशी बरोबरी करेल. उभय संघांमध्ये आतापर्यंत ३६ सामने झाले आहेत आणि त्यापैकी २० सामने मुंबईने, तर १६ सामने चेन्नईने जिंकले आहेत. २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने ६ बाद २१६ धावा केल्या होत्या आणि त्या CSK विरुद्ध त्यांच्या सर्वोच्च धावा ठरल्या. तेच २०१३ मध्ये CSK ने मुंबईविरुद्ध ७९ ही निचांक धावसंख्या नोंदवली होती.  

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि दव फॅक्टर महत्त्वाचा असल्याने हा निर्णय घेतल्याचे हार्दिक पांड्याने सांगितले. मुंबईच्या ताफ्यात आज कोणताही बदल नाही, परंतु चेन्नईने मथिशा पथिराणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेताना महिशा तिक्षणाला विश्रांती दिली. 

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सहार्दिक पांड्यामहेंद्रसिंग धोनी