Join us  

IPL 2024: लांब केस, लाल बंदाना... जुन्या रूपात परतला 'कॅप्टन कूल'! धोनीच्या नव्या लूकवर चाहते फिदा

सीएसकेने ट्रेनिंग सेशनचा फोटो केला पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:46 PM

Open in App

MS Dhoni hairstyle IPL 2024: 17व्या हंगामापूर्वी, चेन्नई सुपर किंग्स (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी चर्चेत आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या माहीची क्रेझ अजूनही कायम आहे. त्याने गेल्या मोसमात सीएसकेला चॅम्पियन बनवले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघ पाचव्यांदा चॅम्पियन बनला. आता माही नव्या सीझनमध्येही त्याची खेळी दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. तशातच धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लाल हेअरबँड लावून लांब केस वाढवून जुन्या लूकमध्ये दिसत आहे.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा त्याच्या फलंदाजीसोबतच त्याच्या लांब लांब केसांचेही चाहते होते. देशातच नाही तर परदेशातही धोनीच्या लूकची क्रेझ होती. त्यामुळे आता जुन्या दिवसांची आठवण करून देणारा धोनीचा हा लूक पसंतीस उतरत आहे.

CSKच्या ट्रेनिंग सेशन दरम्यान माही सीएसकेच्या सहकाऱ्यांसोबत धावत होता. त्यावेळी त्याचे लांब केस वाऱ्यावर उडत असतानाच तो फोटो आहे. हा फोटो चाहत्यांना भलताच आवडा आहे. तो त्याच्या जुन्या लूकमध्ये दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. धोनी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सराव करताना दिसला. CSK ने त्याचे इतर फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. माहीने फलंदाजीच्या सरावात दमदार षटकारही मारले.

२०१८ पासून चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंचा सराव पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये पोहोचतात. हे इतर कोणत्याही संघासोबत क्वचितच घडते. स्टेडियममध्ये 'धोनी-धोनी' आवाज घुमला. सीएसकेचे चाहते धोनीची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. धोनी ट्रेनिंग सेशनसाठी चेन्नईला आला तरीही लोक त्याचे जोरदार स्वागत करतात. तशातच आता त्याच्या या नव्या लूकचे त्यांनी जोरदार स्वागत केले आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२४महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सव्हायरल फोटोज्सोशल मीडिया