Join us

महेंद्रसिंग धोनीच्या 'New Role' चा सस्पेन्स मिटला, स्वतः फेसबूक पोस्टवरून दिली माहिती

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काही दिवसांपूर्वी नवीन पर्व, नवीन भूमिका असे ट्विट करून चाहत्यांना आश्चर्यचकीत केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:58 IST

Open in App

IPL 2024 MS Dhoni New Role :  भारताचा माजी यष्टिरक्षक आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काही दिवसांपूर्वी नवीन पर्व, नवीन भूमिका असे ट्विट करून चाहत्यांना आश्चर्यचकीत केले होते. चेन्नई सुपर किंग्सकडून कॅप्टन कून धोनीचे हे शेवटचे पर्व असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशी चर्चा मागील दोन पर्व रंगली होती आणि धोनीने प्रत्येक वेळी त्या चर्चा अखेरच्या क्षणी टोलवून लावल्या. पण, त्याचं वय पाहता यंदाचे पर्व हे शेवटचे हे निश्चित मानलं जातंय आणि त्यामुळेच त्याच्या New Role पोस्टनंतर तो CSK चा मेंटॉर म्हणून काम करेल अशी चर्चा रंगली. आता धोनीनेच हे सस्पेन्स दूर केले आहे. धोनीने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर नवीन भूमिकेबद्दल सस्पेन्स मिटलवला.

सोमवारी धोनीने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली, त्यात लिहिले, "नवीन हंगाम आणि नवीन 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही. सोबत रहा!" ४२ वर्षीय महेंद्रसिंग धोनी आगामी IPL 2024 स्पर्धेत CSK संघाचे नेतृत्व करेल. स्पर्धेची सुरुवात २२ मार्च रोजी चेपॉक येथे होईल आणि स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात CSK ची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध लढत होणार आहे. धोनी  आयपीएलसाठी जिओ सिनेमाच्या जाहिरातीत दिसला आहे आणि यामुळे त्याच्या नवीन 'भूमिके'बद्दलच्या सस्पेन्सला पूर्णविराम मिळाला आहे. या जाहिरातीत धोनी दुहेरी भूमिका साकारताना दिसत आहे.

धोनीने त्याच्या फेसबुक पेजवर जाहिरातीचा व्हिडिओ अपलोड केला आणि Ji o Cinema टॅग करत त्याने लिहिले , “नवीन सीझन, डबल रोल! 22 मार्चपासून #IPLonJioCinema वर तुमच्यासाठी पूर्णपणे विनामूल्य आहेत. क्यूंकी सब यहाँ, और कहाँ!”

टॅग्स :आयपीएल २०२३महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सऑफ द फिल्ड