Join us  

MI vs CSK: हार्दिक पांड्या करणार 'या' खेळाडूचा पत्ता कट, अर्जुन तेंडुलकरला मिळणार संधी?

अर्जुन तेंडुलकर नेट्समध्ये लसिथ मलिंगासोबत यॉर्करचे धडे गिरवताना दिसला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 2:39 PM

Open in App

Arjun Tendulkar Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs CSK: IPLचा हंगाम सुरु झाला की साऱ्यांना प्रतीक्षा असते ती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याची. आजच्या रविवारी दोन मोठे सामने खेळवले जाणार आहेत. एकीकडे लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हा सामना रंगेल. तर संध्याकाळी आयपीएलचे दोन सर्वात मोठे प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) वानखेडेवर आमनेसामने येतील. चारही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण गुणतालिका अतिशय रंजक टप्प्यावर आहे. सध्या चारपैकी तीन संघांचे (CSK, KKR, LSG) 6 गुण आहेत, तर मुंबईचे 4 गुण आहेत. Top 4 च्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आज मुंबईचा संघ जिंकण्याच्या मानसिकतेने उतरेल. याच पार्श्वभूमीवर आज हार्दिक पांड्या एक महत्त्वाच्या खेळाडूचा संघातून पत्ता कट करू शकतो.

संघात बदल होण्याची शक्यता

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने सुरूवातीचे तीन सामने हरले. त्यानंतर मुंबईला दोन सलग विजय मिळाले. मुंबईच्या फलंदाजीत अनेक चेहरे चमकले आहेत. रोहित शर्मा, इशान किशन , सूर्यकुमार यादव यांनी आपली चमक दाखवली आहे. तसेच टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्डने देखील आपली ताकद दाखवून दिली आहे. गोलंदाजी जसप्रीत बुमराह अतिशय भेदक मारा करत गरजेच्या वेळी विकेट्स घेत आहे. पण त्याला अपेक्षित साथ मिळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आकाश मढवालला संघाबाहेर करू शकतो असा अंदाज आहे.

एका खेळाडूचा पत्ता कट?

राजस्थान विरूद्ध ३ बळी घेणारा आकाश मढवाल RCB आणि दिल्लीच्या संघासमोर प्रचंड फिका पडला. या दोन सामन्यात टाकलेल्या ८ षटकांमध्ये त्याने तब्बल १०२ धावा खर्च केल्या. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन सामन्यात मिळून त्याला केवळ एकच बळी टिपता आला. त्याची गोलंदाजी सध्या मुंबईच्या चिंतेचे कारण बनले आहे. त्यामुळे मुंबई हार्दिक त्याला संघाबाहेर करू शकतो. त्याच्या जागी संघात वेगवान गोलंदाज म्हणून अर्जुन तेंडुलकरला संधी मिळू शकते. अर्जुन तेंडुलकर नेट्समध्ये लसिथ मलिंगासोबत यॉर्करचे धडे गिरवताना दिसला होता.

संभाव्य संघ: रोहित शर्मा, इशान किशन (डब्ल्यूके), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, अर्जुन तेंडुलकर (इमॅप्क्ट प्लेयर- सूर्यकुमार यादव)

 

टॅग्स :आयपीएल २०२४हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सअर्जुन तेंडुलकर