IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. LSG चा सात सामन्यांतील चौथा विजय ठरला आणि ८ गुणांसह ते CSK, KKR, SRH यांच्या पंक्तित जाऊन बसले. चेन्नईच्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना पहिल्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी करून पाया मजबूत केला. त्यावर विजयी कळस चढवण्यात अन्य फलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागले नाहीत.
४२ वर्षीय महेंद्रसिंग धोनीचा Innovative Six! सूर्यकुमार, एबीची '360°' पानी कम चाय
LSG च्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना CSK च्या धावांवर वेसण घातले होते. पण, रवींद्र जडेजाने संयमी खेळ करताना डावाला आकार दिला. अजिंक्य रहाणे ( ३६), मोईन अली ( ३०) यांनी हातभार लावला. महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला तेव्हा खरी मजा आली. लखनौचे प्रेक्षक धोनीची आतुरतेने वाट पाहत होते आणि धोनीने ९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २८ धावांची आतषबाजी केली. चेन्नईने ६ बाद १७६ धावा उभ्या केल्या. जडेजाने ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ५७ धावा केल्या. LSGच्या कृणाल पांड्याने २ विकेट्स घेतल्या, तर मोहसीन खान, यश ठाकूर, मार्कस स्टॉयनिस व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्यानंतर आलेल्या निकोलस पूरननेही सुरुवातीपासूनच हात मोकळे केले. लोकेशने आज आयपीएलमधील ५००० धावांचा टप्पा पार केला. लोकेस ५३ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावांवर बाद झाला. १८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजाने वाऱ्याच्या वेगाने हवेत झेप घेत अप्रतिम झेल टिपला. जाँटी ऱ्होड्सनेही या कॅचचे कौतुक केले. निकोलसने नाबाद २३ धावा केल्या आणि लखनौने १९ षटकांत २ बाद १८० धावा करून सामना जिंकला.