IPL 2024 SRH vs CSK: सनरायझर्स हैदराबादचा दबदबा कायम! CSK चा सलग दुसरा दारूण पराभव

IPL 2024 SRH vs CSK Match: सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 22:53 IST2024-04-05T22:49:40+5:302024-04-05T22:53:56+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2024 Live Score Update SRH vs CSK Sunrisers Hyderabad beat Chennai Super Kings by 6 wickets | IPL 2024 SRH vs CSK: सनरायझर्स हैदराबादचा दबदबा कायम! CSK चा सलग दुसरा दारूण पराभव

IPL 2024 SRH vs CSK: सनरायझर्स हैदराबादचा दबदबा कायम! CSK चा सलग दुसरा दारूण पराभव

IPL 2024 SRH vs CSK Match Live Updates । हैदराबाद: अभिषेक शर्माची स्फोटक खेळी आणि एडन मार्करमच्या सावध खेळीने चेन्नईच्या शिलेदारांना पराभवाची धूळ चारली. आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबादने ४ गडी राखून विजय मिळवला. चेन्नईने दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांनी चांगली सुरुवात केली. सलामीवीर अभिषेक शर्माने १२ चेंडूत ३७ धावा कुटल्या अन् पाहुण्यांना घाम फोडला. अभिषेकला बाद करण्यात दीपक चाहरला यश आले पण तोपर्यंत यजमान मजबूत स्थितीत पोहोचले होते. मग एडन मार्करमने अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात हातभार लावला. अखेर हैदराबादच्या संघाने १८.१ षटकांत ४ बाद १६६ धावा करून ६ गडी आणि ११ चेंडू राखून विजय मिळवला. (IPL 2024 News) 

चेन्नईकडून मोईन अलीने सामन्यात रंगत आणली पण तो देखील संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड (३१), अभिषेक शर्मा (३७), एडन मार्करम (५०), शाहबाज अहमद (१८), हेनरिक क्लासेन (नाबाद १० धावा) आणि नितीश रेड्डीने नाबाद (१४) धावा केल्या. चेन्नईकडून मोईन अली (२) तर महेश तीक्ष्णा आणि दीपक चाहर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६५ धावा केल्या होत्या. यजमान हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, पॅट कमिन्स, शाहबाज अहमद, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. गोलंदाजांनी केलेल्या सांघिक खेळीच्या जोरावर यजमानांनी सामन्यात पुनरागमन केले. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूत ४५ धावा कुटल्या, तर रचिन रवींद्र (१२), ऋतुराज गायकवाड (२६), अजिंक्य रहाणे (३५) आणि डेरिल मिचेल (१३) धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा (३१) आणि महेंद्रसिंग धोनी (१) धावा करून नाबाद परतला. 

SRH चा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, टी नटराजन. 

CSK चा संघ -
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डेरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा. 

Web Title: IPL 2024 Live Score Update SRH vs CSK Sunrisers Hyderabad beat Chennai Super Kings by 6 wickets