Join us  

IPL 2024 SRH vs CSK: हैदराबादने टॉस जिंकला! चेन्नईने केले तीन मोठे बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री

IPL 2024 Live Score Update SRH vs CSK: आज सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 7:14 PM

Open in App

IPL 2024 SRH vs CSK Match Live Updates । हैदराबाद: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील अठरावा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होत आहे. (SRH vs CSK) यंदाच्या हंगामातील तगड्या संघापैकी एक असलेले हे संघ आज भिडत आहेत. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर चेन्नईने आजच्या सामन्यासाठी तीन मोठे बदल केले आहेत. अपेक्षेप्रमाणे वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आजच्या सामन्याला मुकला आहे. पण, इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीची संघात एन्ट्री झाली आहे. (IPL 2024 News) 

चेन्नईच्या संघात मुस्तफिजुर रहमान आणि मथीक्क्षा पथिराना यांच्या जागी महेश तीक्क्ष्णा आणि मुकेश चौधरी यांना संधी मिळाली आहे. तर मोईन अली देखील प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. 

दरम्यान, पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी हैदराबादने संघात दोन बदल केले आहेत, तर सीएसकेने तीन बदल केले. हैदराबादच्या संघात मयंक अग्रवालच्या जागी नितीश रेड्डीला स्थान मिळाले आहे, तर नटराजनचे संघात पुनरागमन झाले आहे. या सामन्यासाठी पाहुण्या चेन्नईने मोईन अली, महेश तीक्ष्णा आणि मुकेश चौधरी यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

SRH चा संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, टी नटराजन. 

CSK चा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डेरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा. 

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२४ऋतुराज गायकवाड