Join us

दिल्लीचा कर्णधार पंतवर बंदीची टांगती तलवार?

ऋषभ पंतला यंदा आयपीएलमध्ये एका सामन्यासाठी बंदीचा सामना करावा लागू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 09:21 IST

Open in App

नवी दिल्ली: दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला यंदा आयपीएलमध्ये एका सामन्यासाठी बंदीचा सामना करावा लागू शकतो. या यष्टिरक्षक-फलंदाजावर दोनवेळा दंडात्मक कारवाई झाली. षटकांची गती कायम राखण्यात तो अपयशी ठरल्यामुळे पहिल्यांदा १२ लाखांचा, तर दुसऱ्यांदा २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

त्याने पुन्हा एकदा  चूक केल्यास त्याला बंदीचा सामना करावा लागू शकतो. शुक्रवारी झालेल्या सामन्यात  दिल्ली संघ १६ व्या षटकापर्यंत वेळेच्या मागे होता. मात्र, त्यानंतर त्यांनी वेगाने षटके टाकत षटकांचा कोटा वेळेत संपविला. तिसऱ्यांदा देखील संघाने तीच चूक केली अन् षटकांची गती संथ राखली  तर दंडाची रक्कम ३० लाख रुपये आणि कर्णधारावर एका सामन्याची बंदी येते.

टॅग्स :रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सआयपीएल २०२४